Hug Day : पार्टनरला हग करत असताना 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:00 AM2020-02-12T10:00:25+5:302020-02-12T10:16:06+5:30
आज व्हॅलेनटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजेच हग डे आजच्या दिवशी पार्टनरला मिठी मारली जाते.
आज व्हॅलेनटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजेच हग डे आजच्या दिवशी पार्टनरला मिठी मारली जाते. तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरला मिठी मारून आजचा दिवस साजरा करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. तसं पाहायला गेलं तर पार्टनरला मिठी मारण्यासाठी हग डे ची गरज नसते. कधीही तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हग करू शकता.
पण हे करत असताना काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या एक्साईटमेंटमुळे पार्टनर नाराज सुद्धा होऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या पार्टनरला हग करून तुम्ही कशाप्रकारे तुमच्या नात्यातील दुरावा मिटवून प्रेम अधिक वाढवू शकता.
(image credit-iti.cat)
पार्टनरला हग करण्याआधी तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता याची त्या व्यक्तीला जाणीव करून द्या. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हळूवारपणे पार्टनरला जादू की झप्पी द्या. नंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या डोळ्यात प्रेम दिसून येईल. अनेक रिसर्चमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की पार्टनरला मिठी मारल्यानंतर प्रेम टिकून राहतं आणि पॉजिटिव्ह भावना निर्माण होतात.
जर तुम्ही पहिल्यांदात आपल्या पार्टनरला हग करत असाल तर आपल्या भावनांना आवर घाला. जास्त घाई केली तर पार्टनरला तुमचा राग येऊन अनकंफर्टेबल सुद्धा वाटू शकतं.
पार्टनरला हग करत असताना जास्त घट्ट मिठी मारू नका. किंवा जास्त हलकी सुद्धा मारू नका. तुमच्या फिंलिग्सची जाणीव तुमच्या पार्टनरला जाणीव होईल अशी मिठी मारा. मग तुमच्या भावना तुम्हाला व्यक्त कराव्या लागणार नाहीत पार्टनरला आपसुकच तुमच्या भावना समजतील.
मिठी मारत असताना जास्त उताविळपणे मारू नका. आधी पार्टनरच्या डोळ्यात डोळे घालून बघा. मग स्मित हास्य करत पार्टनरला मिठी मारा. जास्त वेळ मिठीत राहण्यापेक्षा लहानशी मिठी मारून आपल्या मनातली गोष्ट पार्टनरला कानात सांगून बाजूला व्हा. जर तुम्ही आई कॉन्टॅक्ट ठेवाल तर पार्टनरकडून चांगला प्रतिसाद मिळेल. ( हे पण वाचा-'या' तीन राशींचे पार्टनर आपल्या भावना ठेवतात लपवून!)
मुलींना नेहमी आपल्या गळ्यात हात टाकून चालणारी मुलं आवडतात. पण तेच मुलांना मुलींच्या कमरेवर हात ठेवून चालायला आवडत असतं. त्यामुळे मिठी मारताना पार्टनरला खूश करण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या. ( हे पण वाचा-म्हणून लग्न करताना पार्टनर वयाने मोठा असावा...)