रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 01:06 PM2018-04-18T13:06:35+5:302018-04-18T13:06:35+5:30

तुमच्या रागावलेल्या गर्लफ्रेन्डला किंवा पत्नीला कसं मनवायचं याच्या काही खास आयडियाच्या कल्पना आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Ideas to make happy your girlfriend after fight | रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया

रागावलेल्या गर्लफ्रेन्डला मनवण्याच्या काही रोमॅंटिक आयडिया

Next

छोड्या छोट्या भांडणामुळे तुमच्या नात्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. छोटी भांडणं सोडवली जाऊ शकतात. पण मोठी भांडणं झाली की, ती सोडवणं आणि ती विसरुन पुन्हा नव्याने सुरुवात करणं तसं कठिण काम. मात्र, महिला या फार इमोशनल असतात. त्यामुळे तुम्ही जर योग्य प्रकारे त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकतं. तुमच्या रागावलेल्या गर्लफ्रेन्डला किंवा पत्नीला कसं मनवायचं याच्या काही खास आयडियाच्या कल्पना आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1) चांगलं गिफ्ट द्या

तुमचं गर्लफ्रेन्ड किंवा बायकोसोबत भांडण झालं असेल तर तिला मनवण्याची परफेक्ट आयडिया म्हणजे गिफ्ट. तुमच्या पार्टनरला एक चांगलं गिफ्ट द्या. खासकरुन तिला आवडणारी एखादी वस्तू तिला तुम्ही मनापासून दिली, तर तिचा राग नक्कीच दूर होईल आणि ती सगळ्या गोष्टी विसरुन नव्याने सरुवात करेल.

2) तुमच्या प्रेमाची डॉक्युमेंट्री

तुमच्याकडे दोघांचे कितीतरी फोटोज असतील, या फोटोंना एकत्र करुन एक व्हिडीओ तयार करा. तुम्ही दोघांनी एकत्र घालवलेले रोमॅंटिक क्षण तिला तुमच्या जवळ आणतील.

3) सरप्राईज डेट

भांडण झाल्यावर तुमच्या गर्लफ्रेन्ड किंवा पत्नीचा राग दूर करण्यासाठी तुम्ही एक चांगली सरप्राईज डेट प्लॅन करु शकता. आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांना द्यायला वेळच नसतो. अशात तुमचं भांडण झाल्यावर तुम्ही तिला एका सरप्राईज डेटला घेऊन जाऊ शकता.

4) फक्त बोलू नका, ऐकण्याचीही सवय करा

अनेक पुरुष हे भांडण सुरु असताना महिलांचं ऐकत नाहीत. त्यांच्या विचारांना, त्यांच्या मताला किंमत देत नाहीत. त्यामुळे महिला अधिकच चिडतात. अशात जर भांडण सुरु असेल तर आधी तिचा मुद्दा समजून घ्या. त्यावर शांततेने विचार करा आणि मग बोला. कदाचित, ती रागावणार सुद्धा नाही.

5) तुमच्या जीवनातील तिचं महत्व पटवून सांगा

अनेकदा प्रेम असूनही काही पुरुष गर्लफ्रेन्ड किंवा बायकोला त्याच्या जीवनातील महत्व स्पष्टपणे सांगत नाहीत. रागाच्या भरात भांडण तर होऊन जातं, पण त्याचे मोठे परीणाम पुढील काही दिवस भोगावे लागतात. अशावेळी झालेल्या भांडणाचा राग मनात न ठेवता तिला तुमच्या जीवनातील तिचं महत्व पटवून सांगा. 

6) तुमचं चुकलं असेल तर मान्य करा

अनेकदा स्वत:चं चुकूनही अनेक पुरुष आपली चूक मान्य करत नाहीत. भांडणासाठी ते गर्लफ्रेन्ड किंवा पत्नीलाच जबाबदार धरतात. अशात त्यांच्या मनावर याचा दुरगामी परीणाम होऊ शकतो. त्यामुळे असे न करता राग शांत झाल्यावर आपली चूक मान्य करा.
 

Web Title: Ideas to make happy your girlfriend after fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.