बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:59 PM2019-04-30T12:59:51+5:302019-04-30T13:07:24+5:30
लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो.
लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. तर काही त्यांना समजून घेणाऱ्या पार्टनरच्या शोधात असतात. काहीजणी तर पार्टनरच्या अपेक्षांबाबत एक लांबलचक लिस्टच करून तयार असतात. पण तुम्ही त्या मुलींपैकी असाल ज्या आधीपासूनच आपल्या बॉयफ्रेंडसोबत एन्गेज आहात आणि त्याच्याशीच लग्न करण्याच्या विचारात आहात, तर तुम्ही घाई न करता काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. जरी तुम्ही अनेक दिवसांपासून एकत्र असाल तरी लग्न करण्याआधी काही बाबतीत विचार करणं गरजेचं असतं. आम्ही आज लग्नासाठी मुलगा निवडण्यासाठी त्याच्या काही परफेक्ट गुणांबाबत सांगणार आहोत. जर हे सर्व गुण तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडमध्ये दिसत असतील तर तुम्ही त्याची लग्नासाठी नक्की निवड करू शकता. जाणून घेऊया परफेक्ट मॅच ओळखण्यासाठी असलेल्या काही गुणधर्मांबाबत...
1. तुमची काळजी घेईल
काही मुलं प्रचंड केयरिंग असतात. पण काहीं फक्त स्वतःबाबत विचार करत असतात. त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडत असतं त्याबाबत काहीच फरक पडत नाही. अशी मुलं डेटवर आपली गर्लफ्रेडसोबत बाहेर तर जातात पण तिथ गेल्यावर तिच्या आवडीकडे लक्षं देण्याऐवजी फक्त स्वतःच्याच आवडीचा विचार करतात. जर तुमच्याबाबतीतही असचं घडत असेल तर लग्न करण्याआधी पुन्हा एकदा विचार करा. कारण प्रश्न फक्त डेटवर गेल्यानंतरचा नाही तर संपूर्ण आयुष्यभराचा आहे.
2. तुमच्यावर बंधन तर घालणार नाही ना?
काही बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला फार डॉमिनेट करत असतात. तिच्यावर सतत बंधन घालत असतात. हे करू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, आताच्या आता भेटायला ये अशा अनेक गोष्टी ते तिच्यावर लादत असतात. जर तुम्हीही या गोष्टींचा सामना बऱ्याच दिवसांपासून करत असाल तर तुम्ही या नात्याला पूर्णविराम देणं गरजेचं असतं. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो.
3. भविष्याबाबत विचार करा
जर बॉयफ्रेंड नेहमी तुमच्याशी भविष्याबाबत बोलत असेल म्हणजेच, तो तुमच्याशी लग्न, लग्नानंतर कुठे फिरायला जायचं, रूटीन कसं सेट करायचं, तुमची रूम कशी असेल, वीकेंड्सच्या दिवशी काय करायचं या गोष्टींबाबत बोलत असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे. परंतु जर तुम्ही लग्नाबाबत बोलत असाल आणि तो त्याबाबत बोलणं तो टाळत असेल तर तुम्ही याबाबत एकदा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे.
4. नेहमी तुमची साथ देतो
जर तुमचा मूड खराब असेल किंवा कॉलेज आणि ऑफिसमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा आर्थिक अडचणी असतील. यांसारख्या सर्व परिस्थितींमध्ये जर तो तुमच्या मदतीसाठी ठामपणे उभा असेल तर तो तुमच्यासाठी परफेक्ट मॅच आहे. कारण अडचणींच्यावेळी जो तुमच्यासाठी ठामपणे उभा राहतो. तोच आयुष्यभरासाठी आपली साथ निभावतो.
5. अॅडजस्टमेंट करण्यासाठी तयार असेल
लग्नानंतर फक्त एका मुलीच्या आयुष्यातच नाही तर मुलाच्या आयुष्यातही अनेक बदल घडून येतात. पण मुलांच्या तुलनेत मुली नेहमी जास्त अॅडजस्टमेंट करताना दिसतात. पण अनेकदा मुलं स्वतःला अजिबातच अॅडजस्ट करत नाहीत. जर ती व्यक्ती तुमच्यासोबत अॅडजस्टमेंट करण्यासाठी तयार असेल तर हाच तुमचा परफेक्ट पार्टनर आहे.
6. तुम्हाला स्वप्नांकडे घेऊन जातो
जर तुमच्या पार्टनरला माहीत असेल की, पुढे जाऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तुमची मदत करत असेल तर असा मुलगा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. फार कमी मुलं असतात जी आपल्या पार्टनरच्या फ्युचरसाठी उभी राहतात. त्यामुळे डोळे बंद करून तुम्ही या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकता.
7. रिस्पेक्ट देणं गरजेचं
फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्याशी निगडीत प्रत्येक माणसाचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जर त्या व्यक्तीला माहीत असेल की, कोणत्या व्यक्तीला किती रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, तर अशा व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.