घरात लहान मुले असतील तर परफ्यूम आणि डिओड्रन्ट वापरताना घ्या काळजी, नाही तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:39 PM2019-06-21T12:39:32+5:302019-06-21T12:46:32+5:30
आजच्या जमान्यात क्वचितच असं कुणी असेल जे डिओटड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत नसतील. मग वय कोणतंही असो, महिला असो वा पुरूष असो सगळ्यांना असं वाटतं की, त्यांच्या शरीराचा चांगला सुंगध यावा.
(Image Credit : The List)
आजच्या जमान्यात क्वचितच असं कुणी असेल जे डिओटड्रेंट किंवा परफ्यूमचा वापर करत नसतील. मग वय कोणतंही असो, महिला असो वा पुरूष असो सगळ्यांना असं वाटतं की, त्यांच्या शरीराचा चांगला सुगंध यावा. अशात अनेकजण रोज घामाची दुर्गंधी घालवण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे डिओड्रेंट आणि परफ्यूम वापरले जातात.
बॉटलवर लिहिलेल्या निर्देशांचं पालन न केल्यास नुकसान
(Image Credit : Poison Control)
अनेकजण डिओ किंवा परफ्यूमचा वापर करताना बॉटलवर देण्यात आलेल्या निर्देशांचं पालन कुणीच करत नाही. जे महागात पडू शकतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये असं सिद्ध झालं की, लहान मुलांना होणाऱ्या जखमांमध्ये १२.७ टक्के जखमा पर्सनल केअर प्रॉडक्ट्समुळे लागतात. ज्यात डिओड्रेंट आणि परफ्यूमचाही समावेश आहे. याप्रकारच्या वस्तू लहान मुलांसाठी फार नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे यांचा वापर करताना आई-वडिलांनी फार काळजी घेतली पाहिजे.
या वस्तू लहान मुलांपासून दूर ठेवा
परफ्यूम आणि डिओड्रेंटसारख्या वस्तू लहान मुलांपासून दूरच ठेवल्या पाहिजेत. कारण लहान मुलं चुकून डोळ्यांवर स्प्रे करू शकतात, त्यांच्या नाकात, कानात आणि तोंडातही जाऊ शकतं. असं होणं त्यांच्यासाठी फारच हानिकारक ठरू शकतं. इतकेच नाही तर घरात जर जास्त लहान मुले-मुली असतील तर पालकांनी फार जास्त काळजी घ्यावी. अशा वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवाव्या.
लहान मुलांच्या आरोग्याला समस्या
जर तुमच्या घरात १३ ते १७ वयोगटातील मुलं असतील तर त्यांना मित्रांच्या प्रेशरमुळे होणाऱ्या वेगळ्या समस्या होऊ शकतात. मोठी मुलांनाही चांगला सुगंध येतो म्हणून या गोष्टी ट्राय करायच्या असतात. अशात कमी वयातच डिओड्रेंट किंवा परफ्यूमचा अधिक वापर केल्याने लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. घरातील मोठी लोकंच जर बॉटलवरील सूचना वाचत नाही तर मुलंच कुठून वाचतील. त्यामुळे त्यांना स्कीन अॅलर्जी, रिअॅक्शन, अस्थमा आणि श्वास घेण्याची समस्या होऊ शकते.