ब्रेकअपनंतर पुन्हा पॅचअप करायचं असेल तर वापरा 'हा' फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:48 PM2020-01-29T14:48:50+5:302020-01-29T14:51:18+5:30
अनेकदा आपली आणि आपल्या पार्टनरची भांडण होतात.
अनेकदा आपली आणि आपल्या पार्टनरची भांडणं होतात. त्यामुळे तो काळ आपल्यासाठी खूप वाईट असतो. काहीजण रागाच्या भरात आपल्या पार्टनरला उलटसुलट बोलतात. त्यामुळे नातं तुटतं. मग राग शांत झाल्यानंतर असं वाटायला लागतं की आपण असं का केलं. आपल्याला पुन्हा आपल्या पार्टनरसोबत पॅचअप करावसं वाटत असतं. कारण तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लांब राहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा पॅचअप कसं करायचे हे सांगणार आहोत.
ब्रेकअपनंतर लगेच इतर मुलींना डेट करू नका
ब्रेकअप केल्यानंतर काही मुलं भावनाशून्य असल्यासारखे वागत असतात. किंवा इतर मुलींशी जास्त बोलणे आपल्या एक्सच्या समोर इतर मुलींसोबत बोलणे. त्यामुळे तुमच्या एक्सच्या मनात तुमच्याबद्दल असंवेदनशीलता येण्याची शक्यता असते. तसंच तुमच्यासोबत पुन्हा पॅचअप करण्याचे होप्स सुद्धा संपलेले असतात.
नकरात्मक गोष्टींपासून लांब रहा
(image credit-black magic)
अनेकदा मुलं ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या गर्लफ्रेन्डच्या जुन्या गोष्टी आठवत असतात. ज्यामुळे तुम्हाला मानसीक ताण येत असतो. त्यामुळे मुलं निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतात. पण जर तुम्हाला त्याच व्यक्तीसोबत पुन्हा पॅचअप करायचं असेल तर नकारात्मक गोष्टींपासून लांब रहा. ज्यामुळे तुम्ही खूप रिलॅक्स फील कराल.
सोशल मीडियावर जगजाहीर करू नका
ब्रेकअपनंतर आपल्या बॉयफ्रेडद्दल किंव गर्लफ्रेन्डबद्दल सोशल मीडीयाचा वापर करून सगळ्यांना सांगण्याची काही गरज नाही. कारण जर तुम्ही सोशल मिडीयाचा आधार घेऊन जर पार्टनरविषयीच्या भावना व्यक्त करत असाल तर तुम्हाला दुःख होण्याची शक्यता असते.
ब्रेकअपची कारणं समजून घ्या
मुलं किंवा मुली रागाच्या भरात आणि काहीही विचार न करता निर्णय घेत असतात. जर तुम्ही सुद्धा घाईघाईत ब्रेकअपचा निर्णय घेतला असेल तर त्यामागचे कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कराण जर शुल्लक कारणावरून तुम्ही ब्रेकअप केलं असेल तर तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-पार्टनरसोबत डेटला जायचयं पण बजेट कमी? 'या' टीप्स वापराल स्वस्तात मस्त होईल डेट)
कारण ब्रेकअप झाल्यांनंतर अनेक व्यक्ती मानसीकदृष्ट्या थकल्यासारखे वागत असतात. आयुष्य उधवस्त झाल्यसारखं सुद्धा वाटू शकतं. काहीजण नशेच्या आहारी जात असतात. त्यासाठी ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला वेळ द्या. तुम्ही या गोष्टीचा वापर करून स्वतःच्या पार्टनरचा राग दूर करून पुन्हा पॅचअप करू शकता. ( हे पण वाचा-पतीची 10 प्रेमप्रकरणं समजली; तरीही खूश आहे ही महिला...कसे काय?)