... म्हणून बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं; कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:49 PM2019-08-15T16:49:42+5:302019-08-15T16:52:21+5:30
शाळेत असताना तुमच्याही वर्गात कोणीतरी स्कॉलर असेलच. जो पहिल्या बाकावर बसून शिक्षकांचं सर्व लक्ष देऊन ऐकत असेल. मधल्या सुट्टीतही एकटाच डबा खात असेल. त्याला कोणासोबतही जास्त बोलायला आवडत नसेल. त्याला पाहून तुम्ही कधीतरी विचारात पडला असालच आणि असा काय हा?
शाळेत असताना तुमच्याही वर्गात कोणीतरी स्कॉलर असेलच. जो पहिल्या बाकावर बसून शिक्षकांचं सर्व लक्ष देऊन ऐकत असेल. मधल्या सुट्टीतही एकटाच डबा खात असेल. त्याला कोणासोबतही जास्त बोलायला आवडत नसेल. त्याला पाहून तुम्ही कधीतरी विचारात पडला असालच आणि असा काय हा? असा प्रश्नही नक्कीच पडला असेल. पण असं असूनही प्रत्येक परिक्षेत त्याचा पहिला क्रमांक मात्र कायम राहत असेल. कदाचित तुम्हीच असे असाल...
जर तुम्ही जास्त सोशल नसाल किंवा तुम्हाला लोकांना भेटायला जास्त आवडत नसेल तर अजिबात विचार करू नका. कारण तुमच्या असं वागण्यामागील एक पॉझिटिव्ह कारण समोर आलं आहे. एका रिसर्चमधून खुलासा झाल्यानुसार, बुद्धिमान लोक जेव्हा एकटे असतात तेव्हा ते सर्वात जास्त आनंदी असतात. हा रिसर्च वर्ड इकोनॉमिक फॉरमद्वारे करण्यात आला आहे.
18 ते 28 वर्ष वयाच्या 15 हजारांपेक्षा जास्त लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती आनंदी आहात? हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच ते जिथे राहत आहेत, तेथील लोकसंख्या आणि सोशल रिलेशनशिपबाबत त्यांना कितपत आनंद मिळतो हे देखील जाणून घेण्यात आलं.
रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी सांगितले की, साधारणतः बऱ्याच लोकांना जास्त लोकांमध्ये राहायला फार आवडतं. पण बुद्धिमान लोकांना गर्दीमध्ये जाणं किंवा जास्त लोकांमध्ये सहभागी होणं त्यांना फारस आवडत नाही. असं केल्यामुळे ते नेगटिव्ह फिल करू लागतात.
ज्या व्यक्ती फार स्मार्ट असतात, त्या कोणाची तरी कंपनी हवी असते. तसेच त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला किंवा जाणून घ्यायला फार आवडतं. रिसर्चनुसार, जास्तीत जास्त बुद्धिमान व्यक्तींना मित्रांसोबत सतत सोशल व्हायला आवडत नाही. आता असं करण्यामागील कारणं वेगवेगळी असू शकतात. कदाचित यामागे असंही असू शकतं की, जास्त बुद्धिमान व्यक्ती आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असतात. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी लक्ष द्यायला अजिबात आवडत नाही.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.