मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये 'या' 7 गोष्टी असतात खास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:34 PM2019-05-02T17:34:42+5:302019-05-02T17:39:18+5:30
तुमचा जन्म कोणत्या महिन्यामध्ये झाला आहे, त्यानुसारही तुमच्या स्वभावाबाबतच्या अनेक गोष्टी समजणं शक्य होतं.
तुमचा जन्म कोणत्या महिन्यामध्ये झाला आहे, त्यानुसारही तुमच्या स्वभावाबाबतच्या अनेक गोष्टी समजणं शक्य होतं. ज्योतिष शास्त्रानुसार, जन्माची वेळ, दिवस, महिना यासर्व गोष्टींचा माणसाच्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. सध्या मे महिना सुरू आहे. असं म्हटलं जातं की, मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असतात. ते आपल्या मेहनतीच्या जोरावर योजनाबद्ध पद्धतीने जीवन जगत असतात.
क्वीन विक्टोरिया, क्लिंट ईस्टबुड, कार्ल मार्क्स, रविंद्रनाथ टागोर, सत्यजीत रे, जॉन एफ कॅनेडी, आड्री हेपबर्न, मार्क झुकरबर्ग, सनी लिओनी, मॅल्कम एक्स, डेविड बेकहम, जान वाइन, एंडी मरे, बॉब डिलन, जॉर्ज क्लूनी, मेगन फॉक्स, डेविड एटनबरो, सिग्मंड फ्रायड इत्यादी प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचाही जन्म मे महिन्यामध्येच झाला आहे.
(Image Credit : HR News)
1. सेल्फ मोटिवेटेड
मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती सेल्फ मोटिवेटेड असतात. त्या शांत स्वभावाच्या असण्यासोबतच परिपक्व असतात. त्यांना त्यांचं आयुष्यातील उद्देश माहित असतो. ज्या गोष्टीचा ते विचार करतात त्या पूर्ण करण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न ते करतात.
2. इतरांचं लक्ष आकर्षित करणं
मे महिन्यामध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करतात. त्यांना लोकांकडून आपली प्रशंसा ऐकणं आणि प्रेमाची अपेक्षा असते. याच कारणामुळे त्यांना कधी एकटं वाटत नाही. तसेच त्यांना नेहमी कोणच्या तरी साथीची गरज असते.
3. ज्या गोष्टीचा विचार करतात, त्या पूर्ण करतात
मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती जो विचार करतात, तो पूर्णत्वास नेतातच. कोणतंही काम ते प्लॅन न करता करत नाहीत. याव्यतिरिक्त ते आपल्या सोयीनुसार, योजना बनवतात. या व्यक्ती दूरदर्शी असतात. पुढे जाऊन त्यांना कोणत्याही नुकसाना सामोरं जावं लागलं तरी त्यांना त्या गोष्टीचा अजिबात फरक पडत नाही. या व्यक्ती व्यावहारिक असतात.
4. उत्तम पालक असतात
या व्यक्तीं कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात. या व्यक्ती उत्तम पालक बनतात आणि आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त त्यांना कोणत्याही परिस्थितीशी सांभाळून घेणं अगदी उत्तमरित्या जमतं. पैशापासून घर-कुटुंब आणि सोशल लाइफ सर्व गोष्टी या व्यक्ती मॅनेज करतात.
7. कलेवर करतात प्रेम
मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं आपल्या कलेवर प्रचंड प्रेम असतं. तसेच या व्यक्ती कलात्मकतेसोबतच भावनात्मक गोष्टींनाही प्राधान्य देतात. त्यांना पुस्तकं, साहित्य वाचायलाही आवडतं.
6. फिरण्याची प्रचंड आवड
मे महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींना फिरायला प्रचंड आवडतं आणि नवनवीन ठिकाणांबाबत माहिती करून घेण्याचा त्यांना छंद असतो. त्यांना जगभ्रमंती करण्याची इच्छा असते. विविध संस्कृती, इतिहास आणि निश्चित रूपातील कलांचा अनुभव घेण्याची इच्छा असते. तसेच त्यांना स्वतः सर्व गोष्टी करायच्या असतात. एवढचं नाही तर फिरण्यासाठीही त्यांना स्वतःचे पैसे खर्च करण्याची इच्छा असते.
7. राग आहे विकनेस
मे महिन्यामध्ये जन्म झालेल्या लोकांचा राग हाच त्यांची कमजोरी असते. हे जाणून घेणं फार अवघडं असतं की, त्यांचा सध्या काय मूड आहे. यांना कधीही राग येतो किंवा कधीही या व्यक्ती स्वतःला एकटं समजत असतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे याबाबत कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.