Interesting : ‘या’ प्रकारच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात महिला !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 08:14 AM2017-09-15T08:14:48+5:302017-09-15T13:44:48+5:30
विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.
Next
घ ात पती आणि पत्नी दोघांची जबाबदारी वेगवेगळी असते. पतीवर आर्थिक जबाबदारी असते तर पत्नीवर घराच्या सर्व कामकाजाची आणि परिवारातील सर्व सदस्यांच्या देखरेखीची जबाबदारी असते. मात्र सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार पत्नीदेखील आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी स्वत:ला सक्षम समजते आणि त्यादृष्टिने तिचे प्रयत्नही सुरु आहेत. यावरूनच पत्नीचीही अपेक्षा असते की, आपल्या पतीनेही घरकामात मदत करावी. विशेषत: असे पुरुष महिलांना जास्त आकर्षित वाटतात जे घरकामात पत्नीला मदत करतात. जाणून घेऊया अजून कोणत्या प्रकारच्या पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात.
* एकमेकांच्या जबाबदारीची जाणिव
जेव्हा पतीदेखील पत्नीच्या कामात मदत करतो, तेव्हा दोघांना एकमेकांच्या जबाबदारीची जाणिव होत असते. अशावेळी दोघांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधीही मिळते. यामुळे जबाबदारीचे ओझेदेखील कमी होते.
* बरोबरीची जाणिव
पत्नी नोकरीवरून परत आल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी निभविते मात्र हीच गोष्ट पतीदेखील समजत असेल तर दोघांचे नाते अजून घट्ट होते. पतीने सर्वच कामे करावीत असे मुळीच नाही मात्र लहान-लहान कामात पत्नीला मदत करु शकतो.
* सोबत वेळ घालविणे
जेव्हा घराच्या कामात दोघे एकत्र सोबत असतात, तेव्हा त्याचा एक फायदा हा देखील होतो की, दोघेही एकमेकांसोबत काही वेळ व्यतित करु शकतात. यामुळे दोघेजण एकमेकांना चांगले समजू लागतात.
* एकमेकांना समजण्याची संधी
लग्नानंतर दोघांना आयुष्यभर सोबत राहायचे असते. यासाठी दोघांना एकमेकांच्या सवयी, आवड-निवड यांची माहिती असावी. घरकाम सोबत केल्यास या गोष्टींबाबत माहिती तर मिळते शिवाय नात्यात सुधारणा होऊन नवेपण येते.
* प्रेम बहरणे
बऱ्याचदा नोकरीनिमित्त दोघेही दिवसभर बाहेर असतात. संध्याकाळी आल्यानंतर दोघांनीही घरकामात सोबत वेळ व्यतित केला तर एकमेकांमध्ये प्रेम टिकून राहते आणि दिवसेंदिवस ते बहरत असते. यामुळे प्रेमाचा ओलावा दोघांच्या आयुष्यात कायम टिकून राहतो. नात्यात कधी कटूता येत नाही. थोडे वाद झालेच तर घरकामाच्या वेळी ते मिटून जातात आणि पुन्हा तेच प्रेम फुलू लागते.
Also Read : Interesting : ...म्हणून अशा महिलांकडे आकर्षित होतात पुरुष !
: Relation : मुली मैत्री करण्यापासून पडताय लांब, या पद्धतीने करा इंप्रेस !