International Men's Day: पुरूषांनाच माहीत नसतील त्यांच्याबाबतच्या 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:09 PM2019-11-19T15:09:23+5:302019-11-19T15:23:08+5:30
पुरूषांचं होणारं शोषण, पक्षपात, हिंसा, उत्पीडन आणि असमानतेपासून त्यांचा बचाव करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबरच्या १९ तारखेला आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जातो.
असं अजिबात नाही की, केवळ महिलांचच शोषण होतं. पुरूषांचं देखील शोषण होतं, त्यांच्यावर अत्याचार होतात. पुरूषांचं होणारं शोषण, पक्षपात, हिंसा, उत्पीडन आणि असमानतेपासून त्यांचा बचाव करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबरच्या १९ तारखेला आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्ताने आम्ही पुरूषांबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या अनेक पुरूषांनाच माहीत नसतात.
(Image Credit : luxuryshaves.com)
१) एका रिसर्चनुसार, पुरूष आपल्या जीवनातील जवळपास सहा महिने शेव्हिंग करण्यात घालवतात.
२) पुरूष एका मिनिटात ११ वेळ आपल्या पापण्यांची उघड-झाप करतात, तर महिला एका मिनिटात १९ वेळा पापण्यांची उघडझाप करतात.
(Image Credit : slism.com)
३) खोटं बोलण्याबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पुरूष एका दिवसात सरासरी ६ वेळा खोटं बोलतात. तर हेच महिलांचं प्रमाण ३ इतकं आहे.
४) केस असलेल्या पुरूषांपेक्षा टक्कल असलेले पुरूष १३ टक्के अधिक शक्तीशाली मानले जातात.
५) महिलांच्या तुलनेत पुरूषांना दोन पटीने अधिक घाम येतो.
६) महिलांच्या तुलनेत पुरूष 'I LOVE YOU' म्हणण्याचा चान्स अधिक जास्त असतो.
७) एका आकडेवारीनुसार, जगात होण्याऱ्या एकूण आत्महत्यांमध्ये पुरूषांचं प्रमाण ७६ टक्के असतं.