नात्यांची व्याख्या बदलतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:02 AM2018-06-26T02:02:46+5:302018-06-26T02:02:51+5:30

२७ जून रोजी असणाऱ्या ‘वटपौर्णिमे’च्या निमित्ताने तरुणाईच्या विश्वात डोकावून ‘चेंजिंग रिलेशनशिप’ मोडच्या ट्रेंडवर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न.

Interpretation of relationships | नात्यांची व्याख्या बदलतेय

नात्यांची व्याख्या बदलतेय

Next

काळ बदलला, तसे नात्यांचे स्वरूप बदलले, त्याची व्याख्या बदलली. मात्र या नात्यांमधील प्रेम आणि विश्वास आजही तसाच टिकून आहे. २७ जून रोजी असणाऱ्या ‘वटपौर्णिमे’च्या निमित्ताने तरुणाईच्या विश्वात डोकावून ‘चेंजिंग रिलेशनशिप’ मोडच्या ट्रेंडवर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न. वन साईट ‘लव्ह’ पासून सुरू होणारं नातं ‘ब्रेक अप के बाद’ या टोकावर कधी येतं हे कळतही नाही. मात्र सध्याची ही तरुणपिढी आपल्या सर्वच नात्यांबद्दल कमालीची ‘मॅच्युअर्ड’ असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

नात्याची अगदी ढोबळ व्याख्या करायची झालीच तर तो असा एक धागा असतो जो आपल्या अस्तित्वाला दुसºया व्यक्तीच्या अस्तित्वाने बांधून ठेवतो. काळ बदलतो, पिढ्य़ा बदलतात, तसे नात्यांचे संदर्भसुद्धा बदलतात. सध्याची तरुणाईची बरीच नाती ही मैत्री आणि प्रेमाच्या पलीकडच्या त्या ‘अनकन्व्हेन्शनल’ नात्यांची असते, हे बºयाचदा दिसून येतं. ही पिढी आत्ममग्न आहे, आत्मकेंद्री नाही. लग्नाचं बंधन आणि त्या अनुषंगाने येणारी कर्तव्यांची न संपणारी यादी, जातपात-रूढी परंपरा यामध्ये घुसमटणारी अभिव्यक्ती हे सर्व नाकारून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून ते खºया सहचार्याचा अनुभव घेऊ पाहत आहेत.
आजची पिढी ‘आम्ही खूप सॉर्टेड आहोत’, असं म्हणत हा बॉयफे्रण्ड, हा नुसताच मित्र, हा ‘बडी’, हा त्याहून वेगळा असे व्यवस्थित ठरवत करते. पण ‘ती’ वेळ येते, तेव्हा मात्र हे ‘सॉर्टेटपण’ कुठल्या कुठे वाहत जातं कळतंही नाही. बºयाचदा हे यंगस्टर्स नात्यांकडे पाहताना तितक्या सजगतेने पाहत नाही, नाती म्हणजे केवळ सोशल मीडियावर अपडेट करण्याची ‘स्टेटस’ वाटतात. मात्र आई-वडिलांपासून ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडपर्यंतच्या सर्वच नात्यांत ही तरुणपिढी स्वत:ची ‘स्पेस’ जपत असते. ‘आपण’ असलो तरी त्यात ‘मी’ असतो, हे वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावर अधोरेखित करत असते. नात्यांच्या या गुंतागुंतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी की, ही तरुणाई ‘स्वत:’ स्वत:शीच वेगळं नातं शोधतं आहे, त्याच्या शोधासाठी स्वत:चा सहवास एक्सप्लोर करतेय, हा प्रवासही बºयाचदा खडतर असतो. मात्र ही बिनधास्त जगणारी पिढी ‘बेफ्रिक’ होऊन जगण्याशी असलेलं नातं जपताना दिसतेय.
अ‍ॅडव्हर्टायझिंग क्षेत्रात काम करणारा वेदांत सांगतो की, माझं सहा महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालंय. आता मी ‘रिलेशनशिप मोड’च फ्लाईट मोडवर टाकलाय. आता पुढील काही वर्ष केवळ स्वत:साठी जगायचं, मस्त सोलो ट्रीप करायची आणि करिअरकडे लक्ष द्यायचं एवढंच टार्गेट ठेवलंय. तर इंजिनीअरिंग करणारी स्वाती सांगते की, मी दीड वर्ष लिव्ह इनमध्ये राहतेय त्यामुळे आता याबद्दल काही ‘वेगळं’ असं वाटत नाही. आम्ही तो मार्ग स्वीकारलाय. शिवाय, स्वत:ची स्पेस जपून एकत्र जगायचं हाच आमच्या जगण्याचा नियम आहे. कॉमर्स शाखेच्या द्वितीय वर्षाला असणारा नचिकेत सांगतो की, प्रेम या संकल्पनेवर फारसा विश्वास नाही. त्यामुळे एकटं जगतच आयुष्य एन्जॉय करायचं ठरवलयं.
ही काही उदाहरणं बदलत्या नात्याविषयी खूप काही सांगून जातात.

वडाभोवती फेºया मारून हाच नवरा सात जन्म पाहिजे असे जरी म्हटले तरी मधल्या काळात दोघांमधील भांडणे म्हणा किंवा अपघातामुळे म्हणा ते नातं पुढच्या वर्षी टिकलं तरी खूप अशीही सध्याची परिस्थिती आहे.
म्हणून तर लग्नाचं बंधन, जातपात-रूढी परंपरा यामध्ये घुसमटणारी अभिव्यक्ती हे नाकारून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मधून ते खºया सहचार्याचा अनुभव घेऊ पाहत आहे.

Web Title: Interpretation of relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.