इमोशनली किती सेफ आहे तुमचं रिलेशनशिप? या संकेतांवरून जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 04:15 PM2023-11-13T16:15:20+5:302023-11-13T16:16:05+5:30
Relationship Tips : नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं.
Relationship Tips : एक रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्याशिवायही अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती स्ट्रॉंग आहे हेही जाणून घ्यावं लागतं. रिलेशनशिपमध्ये हेही गरजेचं असतं की, तुमच्या भावना जसे की, राग, वेदना, अपेक्षा, प्रेम व्यक्त करू शकले पाहिजे आणि तुमच्या पार्टनरने तुमचं ऐकण्यासोबतच तुम्हाला समजूनही घेतलं पाहिजे. यातून एक मजबूत नातं तयार होतं.
नेहमी कन्फ्यूज राहणं आणि आपल्या इमोशन्सना एक्सप्रेस न करणं तुमचं रिलेशनशिप बिघडवू शकतं. अशाप्रकारचं नातं फार कमी काळ टिकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमचं रिलेशनशिप इमोशनली किती सेफ आहे.
सेन्सिटिव्ह असणं - इमोशनली सेफ रिलेशनशिपचा एक संकेत हा आहे की, तुम्ही आणि तुमचा पार्टनर कोणत्याही मुद्द्यावर एकमेकांसोबत बोलता. दोघेही एकमेकांना सुरक्षेची जाणीव करून देता आणि विना घाबरता आपलं मत एकमेकांसोबत व्यक्त करता.
इमोशन्स दाखवणं - एखाद्या नात्यात भावना व्यक्त करणं कठीण होऊ शकतं. पण त्या लपवणं फार घातक ठरू शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडादीरासोबत शेअर करता तेव्हा त्याला तुम्हाला जाणून घेण्याची संधी मिळते आणि तुमचं नातं आणखी मजबूत होतं.
स्पष्टता ठेवणं - रिलेशनशिपमध्ये दोन्ही लोकांनी स्पष्टता ठेवणं फार गरजेचं असतं. त्याशिवाय गरजेचं आहे की, तुम्ही दोघेही तुमच्या भविष्याबाबत स्पष्ट रहा. याने कोणतंही कन्फ्यूजन राहत आणि रिलेशनशिप पुढे जातं.
काही सीमा ठरवणं - रिलेशनशिपमध्ये स्वत:ची स्पेस असणंही गरजेचं असतं. जे लोक रिलेशनशिपमध्ये एकमेकांना स्पेस देतात त्यांचं रिलेशनशिप फार हेल्दी असतं. गरजेचं आहे की, तुम्ही एकमेकांना जरा फ्री वेळ द्यावा.
अपेक्षा ठेवणं - रिलेशनशिपमध्ये स्थिरता असणं फार गरजेचं असतं. जेव्हा तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं वागणं स्थिर असतं तेव्हा तुम्ही दोन लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवता. पण जे रिलेशनशिप स्थिर नसतं त्यात दोन्ही लोकांना एकमेकांकडून काहीच अपेक्षा नसतात.