Kiss Day : किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे हे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:31 AM2019-02-13T11:31:34+5:302019-02-13T11:32:09+5:30

सामान्यपणे किस सगळेच करतात कुणी गालावर तर कुणी ओठांवर. पण किसचे वेगवेगळे प्रकारची असतात हे फार कुणाला माहीत नसतं.

Kiss Day: Do you know different types of kiss and their meaning? | Kiss Day : किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे हे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का?

Kiss Day : किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे हे अर्थ तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

(Image Credit : InUth.com)

आजचा Kiss Day साजरा केला जाणार आहे. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी Kiss करणं हे उत्तम एक्सप्रेशन समजलं जातं. सामान्यपणे किस सगळेच करतात कुणी गालावर तर कुणी ओठांवर. पण किसचे वेगवेगळे प्रकारची असतात हे फार कुणाला माहीत नसतं. कधी कधी सिनेमांच्या मार्फत अनेकदा किसचे वेगवेगळे प्रकार समोर येतात. पण त्याबाबत पुरेशी माहीत नसते. तसेच वेगळ्या पद्धतीने किस करण्याचा नेमका अर्थ काय? हे मात्र अनेकांना माहित नसतं. तर आज Kiss Day च्या निमित्ताने हेच जाणून घेणार आहोत. 

१) चिक किस : गालांवर केला जाणारा किस म्हणजे चिक किस. हा किस मैत्री दर्शविण्यासाठी किंवा फ्लर्ट करण्यासाठी केला जातो. एखाद्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीला निरोप देतानाही या किसचा वापर केला जातो.

२) एस्किमो किस : एस्किमो किसद्वारे पालक वात्सल्याची भावना व्यक्त करत असतात. पालक पाल्याच्या नाकाला नाक स्पर्श करतात. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक असे किस करतात, म्हणून त्याला ‘एस्किमो किस’ असे म्हटले जाते.

३) सिंगल लिप किस : प्रियकर आणि प्रेयसीमध्ये प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी हा ‘सिंगल लिप किस’ म्हणून ओळखला जातो. अमेरिका, आफ्रिका, इंग्लंड अशा काही देशांत हा प्रकार लोकप्रिय आहे.

४) टीझर किस : बर्‍याच दिवसांनी भेटणार्‍या व्यक्तीविषयी प्रेम दर्शविण्यासाठी कपाळावर, ओठ, हातांवर चुंबन घेण्याला ‘टीझर किस’ म्हणून ओळखले जाते. हे दर्शविण्यासाठी टीझर किस केला जातो.

५) लिंजरिंग लिप : एकमेकांप्रती तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिंजरिंग लिप किस केला जातो. अतिप्रेम व्यक्त करताना असा किस केला जातो. यात केवळ ओठांद्वारे 20 सेकंदांचा किस केला जातो.

६) बटरफ्लाय किस : आनंद किंवा मौज दर्शविताना ‘बटरफ्लाय किस’ केला जातो. यात डोळ्यांच्या पापण्या फुलपाखराप्रमाणे जलदगतीने उघड-बंद करून आनंद व्यक्त केला जातो. 

७) हॅण्ड किस : एकमेकांप्रती आदर, उपकार, कृपा दर्शविण्यासाठी हातांवर किंवा हातांच्या बोटांवर मागील बाजूस किस केला जातो. त्याला ‘हॅण्ड किस’ म्हणून ओळखतात.

८) फोर हेड किस : हा किस तुम्ही एखाद्याचे मित्र असल्यास केला जातो . बरेच जण हा किस स्टार्टर म्हणून वापरतात.

Web Title: Kiss Day: Do you know different types of kiss and their meaning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.