Kiss Day : किस करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:12 PM2019-02-12T15:12:36+5:302019-02-12T15:22:32+5:30
आज व्हॅलेंटाइन वीकचा सहावा दिवस. आज हग डे साजरा केला. तर उद्या किस डे साजरा केला जाणार आहे.
आज व्हॅलेंटाइन वीकचा सहावा दिवस. आज हग डे साजरा केला. तर उद्या किस डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना किस करून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. किसने आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत फार जुनी आहे. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, किस केल्याने नातंही चांगलं राहतं. दोन व्यक्तींमधील भावनिकता वाढते. तसेच किस आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. पण किस यादगार करण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतात. त्या काय आहेत हे खालीलप्रमाणे बघता येईल.
गर्लफ्रेन्डला किस करणे ही फारच खाजगी बाब आहे. पण अनेकजण किस करताना काही चुका करतात. म्हणजे असे काही पदार्थ असतात जे किस करण्यापूर्वी खाल्लेत तर तुमचा मूड खराब करू शकतो. त्यामुळे काही पदार्थ टाळावे.
किस करण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
लसूण
किस करण्याआधी लसूण अजिबात खाऊ नका. लसूण खाल्याने तोडांची दुर्गंधी येईल. लसणाचा दर्प हा फारच उग्र असतो. त्यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड बिघडू शकतो. म्हणजे एक चांगल्या किसचा इथे बट्टयाबोळ होईल.
(Image Credit : YouTube)
अल्कोहोल
किस करण्यापूर्वी अल्कोहोलचही सेवन करू नये. अल्कोहोलमुळे तोंड कोरडं होतं आणि यामुळे तोडांची दुर्गंधी येते. तसेच वाईट बॅक्टेरियाही समोरच्या व्यक्तीच्या तोंडात जातात. अल्कोहोलच्या वासानेही पार्टनरचा मूड खराब होतो.
गम आणि मिंट
अनेकदा आपण श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठी मिंट किंवा गमचा आधार घेतो. पण असं करण नुकसानकारक ठरू शकतो. या दोन्ही पदार्थांमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे बॅक्टेरिया अॅक्टिव होतात. याने तुमच्या श्वासांची दुर्गंधी वाढते.
(Image Credit : Thrillist)
कॉफी
अल्कोहोलप्रमाणेच कॉफीमुळेही तोंड कोरडं होतं आणि यानेही श्वासांची दुर्गंधी येते. त्यामुळे किस करण्यापूर्वी चुकूनही कॉफीचं सेवन करू नका.
काय खाणे ठरेल फायदेशीर?
सफरचंद - सफरचंद खाल्ल्याने लाळ अधिक प्रमाणात तयार होते. लाळेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे याने दुर्गंधी वाढवणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.
ग्रीन टी - ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचं अॅंटी-ऑक्सिडेंट तत्त्व असतं. या अॅंटी-ऑक्सिडेंट तत्त्वांमुळे श्वासांची दुर्गंधी वाढवणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.