kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:09 AM2020-02-13T10:09:51+5:302020-02-13T10:15:22+5:30

व्हॅलेनटाईन वीकचा  सतावा दिवस आज किस डे आहे.

kiss day : read the benefits of kissing | kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!

kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!

googlenewsNext

व्हॅलेनटाईन वीकचा  सातवा दिवस आज किस डे आहे. प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून किस करण्याकडे पाहिलं जातं. अनेकजण किस करून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मग ते हा किस गालावर, मानेवर किंवा हातावर कुठेही करू शकतात. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात. ते तसं असेलही. पण किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. किस केल्याने लोकांना एनर्जी मिळते आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो. चला तर मग किस करण्याचे आरोग्यासाठी तुम्हाला कसे फायदे होतात.  

कॅलरी होतात कमी

एक रोमँटिक किस केल्याने २ ते ३ कॅलरीज तर भावनिक किस केल्याने ५ पेक्षा जास्त कॅलरीज कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किस घेताना जेवढा जास्त वेळ लावाल तेवढ्या कॅलरीज बर्न होतील. इतर शारीरिक क्रियाकलापांमुळे ज्या प्रकारे कॅलरीज कमी होतात अगदी त्याच प्रकारे.

आराम मिळतो

किस केल्याने शरीरात फील-गुड के मिकल्सची निर्मिती होत असल्याने शरीरात ओक्सीटोसिन जे नैसर्गिक आरामदायक हार्मोन आहे, याची पातळी वाढते. याने रिलॅक्स आणि आनंदाची अनुभूती होते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

किस केल्याने दोघांच्या शरीरात रासायनिक बदल होऊन त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. याने शरीर मजबूत होऊन आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.

हार्माेन्सची देवाण-घेवाण

किसिंगमुळे पुरूषांचे हार्मोन्स महिलेच्या तोंडात जाते, ज्यामुळे टेस्टोस्टेरोन सारख्या हार्माेन्सचा संचार होतो. अशात महिलेत उत्तेजना वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची करण्याची इच्छा जागृत होते. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सर्कुलेट करण्यास मदत करतात. 

वाद संपतो

दोघांमधील वाद संपविण्यासाठी एक भावनिक किस महत्त्वाची भूमिका बजाविते. दोघांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप याने सहज मिटतात.

ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं

किस केल्याने शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सरर्क्युलेट करण्यास मदत करतात.

हॅप्पी हार्मोन


किस केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. पण कधी तुम्ही हा आनंद का आणि कसा मिळतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? मुळात किस करतेवेळी मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होता. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. या हार्मोन्समध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरटोनिन यांचा समावेश आहे. याने प्रेमाची भावना वाढते. तसेच याने तुमच्यातील स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाणही कमी होतं. ( हे पण वाचा-गर्लफ्रेंडला चुकूनही 'या' गोष्टी सांगाल तर ब्रेकअप झालंच म्हणून समजा!)

चेहऱ्याचे सौंदर्य खुलते

(Image credit-southern live)

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम आवश्यक असतो. किस केल्याने त्वचेच्या ३० स्नायुंचा व्यायाम होतो, ज्याने गाल टाइट होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. ( हे पण वाचा-'या' तीन राशींचे पार्टनर आपल्या भावना ठेवतात लपवून!)

Web Title: kiss day : read the benefits of kissing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.