'या' वयाच्या मुली होत आहेत डेटिंग वॉयलेन्सच्या शिकार, तुम्हीही आहात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 04:29 PM2019-02-09T16:29:37+5:302019-02-09T16:32:47+5:30
सध्या डेटिंगचं फॅड तरूणाईमध्ये चांगलं वाढलं असून यातून काहींना आनंद मिळत असला तरी काही गंभीर समस्याही डोकं वर वाढत आहेत.
(Image Credit : Rivard Report)
सध्या डेटिंगचं फॅड तरूणाईमध्ये चांगलं वाढलं असून यातून काहींना आनंद मिळत असला तरी काही गंभीर समस्याही डोकं वर वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डेटिंग वॉयलेन्स. डेटिंग वॉयलन्सचा शिकार तरूणी होत आहेत. प्रेमात जास्त भावनिक होत असल्याकारणाने तरूणींना डेटिंगमध्ये सेक्शुअल आणि फिजिलक वॉयलेन्सचा सामना करावा लागता आहे. ही समस्या घरगुती हिंसाचारापेक्षाही गंभीर आहे. या समस्येचा सामना १६ ते २४ वयोगटातील मुलांना करावा लागता आहे.
हायस्कूलचे १० टक्के विद्यार्थ्यांना फिजिकल आणि सेक्शुअल वॉयलन्स समस्येचा सामना करावा लागत आहे. सीडीएसच्या आकडेवारीनुसार, ही बाब समोर आली आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, गेल्या १२ महिन्यात १० टक्के हायस्कूल विद्यार्थिनींनी त्यांच्या पार्टनरवर सेक्शुअल आणि फिजिकल वॉयलन्सचा आरोप लावला आहे.
या आकडेवारीनुसार, १६ ते २४ वयोगटातील मुली याच्या शिकार अधिक होत आहेत. सर्व्हेनुसार, २३ टक्के महिलांनी आणि १४ टक्के पुरूषांनी त्यांच्या पार्टनर्ससोबत इंटीमेट होण्यादरम्यान सेक्शुअल आणि फिजिकल वॉयलन्सचा अनुभव केला.
याचा अनुभव सर्वातआधी ११ वर्ष ते १७ वयोगटातील मुलींना अधिक आला आहे. डेटिंग वॉयलन्सची ही आकडेवारी फिजिकल टुडे ने प्रकाशित केली आहे. डेटिंग वॉयलन्स हा घरगुती हिंसाचारासारखाच महिलांवर होणारा हिंसाचार आहे. यात बॉयफ्रेन्ड रिलेशनशिपदरम्यान पार्टनरला मारझोड करतात किंवा त्यांच्यावर मानसिक-शारीरिक अत्याचार करतात.