जाणून घ्या डेनिम जीन्सचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 02:56 AM2016-03-31T02:56:05+5:302016-03-30T19:56:05+5:30

 जीन्सचा इतिहास सांगणारा ‘लिव्हाईस’ कंपनीने एक महितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे.

Know History of Denim Jeans | जाणून घ्या डेनिम जीन्सचा इतिहास

जाणून घ्या डेनिम जीन्सचा इतिहास

googlenewsNext
ड्यांची फॅशन येते आणि जाते. काही ट्रेंड टिकून राहतात तर काही काळाच्या ओघात मागे पडतात. परंतु डेनिम जीन्सचे वेड गेली 143 वर्षे जसेच्या तसे टिकून आहे. मग तो मुलगा असो वा मुलगी, जीन्स शिवाय कोणाचाच वार्डरोब पूर्ण होत नाही.

जीन्स म्हणजे डेनिम आणि डेनिम म्हणजे जीन्स जणू असे समीकरणच बनले आहे. कितीही वर्षे झाली तरी जीन्स काही खराब होत नाही. उलट जीन्स जितकी जीर्ण तितकी तिची सुंदरता अधिक उठून दिसते. औद्योगिक कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या जीन्सने आता संपूर्ण विश्वात मान्यता मिळवली आहे.

अशा या जीन्सचा इतिहास सांगणारा ‘लिव्हाईस’ कंपनीने एक महितीपट (डॉक्युमेंटरी) तयार केला आहे. या माहितीपटात कंपनीची शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालू असलेली वाटचाल आणि आयकॉनिक 501 जीन्सबद्दलही रंजक माहिती दाखविण्यात आलेली आहे.

जीन्सची सुरूवात कशी झाली. कामगारांपासून ते फॅशन डिझायनर्सपर्यंतचा तिचा प्रवास यामध्ये पाहायला मिळणार. अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि विशेष म्हणजे नॉर्थ कॅरोलिना येथील कोन मिल्स डेनिम फॅक्टरीमधील जीन्सचे कापड बनविणाºया लोकांना भेटता येणार आहे.

मायकल विल्यम्स, अँडी स्पेड, एरिन वॅसन, ग्रेग चॅम्पन, हेन्री रोलिन्स, जॉश पेस्कोविट्झ अशा अनेक फॅशन दिग्गजांचे जीन्सविषयीचे विचार या 18 मिनिटांच्या छोटेखानी माहितीपटात ऐकायला मिळतील. त्यामुळे डेनिम जीन्सचा 143 वर्षांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा माहितीपट (डॉक्युमेंटरी)  पाहायलाच पाहिजे.

Web Title: Know History of Denim Jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.