तुमची मुलं सुद्धा जास्त वेळ ऑनलाईन असतात? वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 05:05 PM2019-12-29T17:05:58+5:302019-12-29T17:14:59+5:30

सध्याच्या काळात सगळ्याच वयोगटातील  मुलांच्या हातात मोबाईल असतात.

know the kids are online most of the time it may harmful for health |  तुमची मुलं सुद्धा जास्त वेळ ऑनलाईन असतात? वेळीच व्हा सावध

 तुमची मुलं सुद्धा जास्त वेळ ऑनलाईन असतात? वेळीच व्हा सावध

Next

(image credit- bbc)

सध्याच्या काळात सगळ्याच वयोगटातील  मुलांच्या हातात मोबाईल असतात. कारण काही घरातील पालकांनीच मुलांना फोनची सवय अगदी लहानपणापासून लावलेली असते. समजा एखादं  लहान मुलं खाण्यापिण्याच्या बाबतीत पालकांना त्रास देत असेल तर ते त्याला व्हिडीओ बघत बघत जेवण्याची सवय लावतात. इथपासून सुरूवात होत जाते. त्यानंतर  त्या मुलांना मोबाईलचं वेड  लागतं.   शरीराने फक्त ते  घरातल्यामध्ये मिसळलेले असातात पण सगळं लक्ष त्यांच मोबाईलमध्ये असतं.

सध्या मुलांचं मानसिक  आरोग्य आणि त्यांचा मेंदूवर होणारा मोबाईलच्या अतिवापराचा परीणाम यांसंबंधी एक रिसर्च समोर आला आहे. यात ७० टक्के पालकांनी हे स्वीकारलं आहे की ते  गरजेपेक्षा जास्तवेळ ऑनलाईन असतात.  ७२ टक्के लोक या गोष्टींशी सहमत आहेत की इंटरनेट आणि  मोबाईचा अतिवापर केल्याचा परिणाम कुटूंबावर पडत आहे. जास्त वेळ ऑंनलाईन असल्याचा नकारात्मक परिणाम होऊन  कौटुंबिक समस्या उद्भवत आहे.

या सर्वेत असं दिसून आलं की ४० टक्के पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांच्या ऑनलाईन राहण्याच्या वेळेला रोखायला हवे. कारण दिवसेंदिवसं  सायबर क्राईम्सच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. इंटरनेटचा वापर हा  मुलांच्या मेंदूवर ताबा मिळवत असतो.  मोबाईल आणि इंटरनेट वापराच्या  सगळी साधनं मुलांना आकर्षीत करत असतात.

(image credit- phys,org)

जर तुम्हाला तुमच्या पाल्यांच्या इंटरनेट वापराबद्दल चिंता होत असेल तर आधी तुम्ही स्वतःच मोबाईलचा वापर  आणि ऑनलाईन असण्याचे प्रमाण यांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या रिसर्चनुसार ७० टक्के  लोकांनी ही गोष्ट  मान्य केली आहे. की  त्यांना  सोशल मिडीया आणि इंटरनेटच्या वापराचे व्यसन आहे. 

(Image credit-doodles.msths.com)

५१ टक्के  लोकं हे  स्वतःच्या वागणूकीतून मुलांचा माध्यमांचा अतिवापर करण्यासाठी प्रभावित करत असतात. जर तुम्हाला मुलं सोशल मिडियाच्या विळख्यात  अडकू नयेत. असं जर तुम्हाला वाटतं असेल  तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पासवर्ड मोबाईलला ठेवत असाल तर  तो मुलांना कळणार नाही याची काळजी घ्या. तसंच  मुलांसमोर मोबाईलचा वापर टाळा. सोशल मिडियावर काहिही पोस्ट करण्याआधी विचार करून कृती करा.

Web Title: know the kids are online most of the time it may harmful for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.