पार्टनरच्या 'या' गोष्टींमध्ये लुडबुड कराल तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:18 PM2020-01-19T15:18:48+5:302020-01-19T15:27:15+5:30

सर्वसाधारणपणे पुरूष आपल्या कामाशी काम ठेवतात.

Know the reasons behind husband shout on wife | पार्टनरच्या 'या' गोष्टींमध्ये लुडबुड कराल तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही

पार्टनरच्या 'या' गोष्टींमध्ये लुडबुड कराल तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही

googlenewsNext

सर्वसाधारणपणे पुरूष आपल्या कामाशी काम ठेवतात. जास्त कोणाशी बोलायला जात नाही. अनेक मुलांना इतरांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं जराही आवडत नाही. त्यांना वेबसिरिज, पोलिटिक्स किंवा आपल्या मित्रांशी मजा मस्ती करायला आवडत असतं. जर तुमचं लग्न झालेले असाल किंवा रिलेशनशीपमध्ये असाल तरी तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे  पुरूषांना राग येतो. तसंच त्यांच्या कोणत्या गोष्टी नाक खूपसलेलं त्यांना जराही आवडत नाही हे माहीत असणं गरजेचं असतं.  कारण तुमच्या काही सवयींमुळे  पार्टनरला राग येण्याची शक्यता असते.

Related image(image credit-aleteia.rog)

तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की बायकोवर किंवा गर्लफ्रेन्डवर प्रेम करणारे पुरूष त्यांनी सांगितलेल्या  सगळ्या गोष्टी ऐकत असतात. 'अगदी तु म्हणशील तसं'  अशा काही जणांच्या रिएक्शन असतात. पण काही  बाबतीत  पुरूष हे महिलांचं म्हणणं न ऐकता स्वतःला हवं तसं करत असतात.  याच गोष्टीमुळे अनेकदा भांडण होण्याची शक्यता असते. कारण काही बाबतीत मुलांना रोखठोक आवडत नसते.  त्यामुळे सगळ्याच मुलींना  हे माहित असायला हवं  की पार्टनरला कोणत्या गोष्टींमध्ये नाक खूपसलेलं आवडत नाही. 

Related image

लुक्स 

Image result for boys looks

(image credit-branded girls)

पुरूषांना आपल्याला कोणती हेअरस्टाईल किंवा कपडे सुट करतात हे माहित असत. पण पार्टनर जेव्हा त्यांना त्यांच्या फॅशन सेन्सबद्दल बोलते. म्हणजेच हेअर कट, नखं कापणे, शेविंग करणे याबाबत जर तुम्ही त्यांना सल्ला द्यायला गेलात तर  पुरूषांची चिडचिड होते. 

ड्राइविंग 

Related image

ड्राइविंग करत असताना पुरूषांना आपल्या ड्राइविंग करण्याच्या पध्दतीवर पूर्ण विश्वास असतो.  अशात जर तुम्ही तुमच्या पार्टनरला ट्रफिक किंवा ड्रायविंग करण्याचे नियम सांगण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा पार्टनरला राग येण्याची शक्यता असते. 

कुटूंब आणि मित्र 

Image result for mens family

(image credit- factor credit)

पुरूषांवर आपल्या कुटूंबाचा आणि मित्रमैत्रिणींचा खूप प्रभाव असतो.  कोणताही निर्णय घेत असताना पुरूष आपल्या घरच्यांना प्राधान्य देऊन मग तो निर्णय घेत असतात. त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल जर कोणी बोललं जर खूप राग येत असतो.  जर तुम्ही तुमच्य़ा पार्टनरच्या कुटूंबियांबद्दल किंवा मित्रांबद्दल नकारात्मक बोलत असता तेव्हा त्यांचा मुड खराब होत असतो. 

कपडे

Related image(image credit-newauthours.wordpress.com)

अनेक  पुरूषांना आपले कपडे आणि रंग किंवा स्टाईल या गोष्टींनी काही फरक पडत नसतो. जे कपडे त्यांना कम्फर्टेबल वाटत असतात तेच कपडे घालतात. तसंच ते कपडे  रिपीट सुद्धा करत असतात. असं असताना मुली जर मुलांना त्याच्या ड्रेसिग सेन्स बद्दल बोलल्या तर त्यांना लगेच राग येऊन वादाला तोंट फुटू शकतं 

क्रिकेट मॅच

Image result for men watching cricket(image credit- getty images,MMCTSU)

अनेक मुलांना  क्रिकेटची मॅच पाहण्यात खूप इन्टरेस्ट असतो . मॅच पाहण्यासाठी मुलं वेडी झालेली असतात. अशाच जर तुम्ही मुलांना मॅच पाहण्यापासून अडवत असाल किंवा त्यांच्या मध्ये येत असाल तर  किंवा मॅचच्या वेळेत सासू सुनेच्या सिरियल्स पाहत असाल तर मुलांचा पारा चढून तुमचं भांडण होण्याची शक्यता असते.

ऑफिसचे काम

Image result for MEN WORKING WITH LAPTOP

मुलांच्या खांद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारीचं ओझं असतं. त्या सांभाळत असताना अनेकदा ताण-तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. जर कामाच्या बाबतीत तुम्ही मुलांना सल्ला द्यायला गेलात तर मुलांना ते पटत नाही.  तसंच सतत फोनकरून कामात व्यस्त असलेल्या मुलांना डिस्टर्ब केल्यामुळे सुद्धा मुलांना तुमचा राग येऊ शकतो. 

Web Title: Know the reasons behind husband shout on wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.