'या' ५ कारणांमुळे इच्छा नसताना सुद्धा लोक लग्न करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:30 PM2020-02-27T14:30:33+5:302020-02-27T14:51:00+5:30
लहान्याचं आधी केलं तर मोठ्याच्या लग्नाचं काय, लोक काय म्हणतील... अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो.
लग्न ही आयुष्यातील खूप मोठी गोष्ट असते एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असणं आणि लग्न करणं यात खूप फरक आहे. माणसाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली असेल तरी लग्नासारखा मोठा निर्णय अनेकजण स्वतःच्या मर्जीने घेत नाहीत. हा निर्णय घेत असताना काहीजण आपल्या मनात जे आहे ते न करता इतर लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतात. अनेक मुलं आणि मुली घरचे आणि नातेवाईक काय म्हणतील याचा विचार करून लग्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला लोक मनाविरूध्द लग्न का करतात याबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कळेल की अशी कोणती स्थिती आल्यानंतर लोक लग्न करायला तयार होतात.
प्रेमात धोका मिळाल्यानंतर
अनेक मुलांना आणि मुलांना फक्त आपल्या पार्टनरकडून दगा मिळाल्यामुळे लग्न करावसं वाटत असतं. कारण एकदा त्यांच्या पार्टनरने त्यांना चिट केल्यामुळे पुन्हा आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून लग्न करण्याचा निर्णय घेतात.
आर्थिक बळासाठी
तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण मोठ्या शहरांमध्ये राहत असलेल्या मुली फक्त जास्त पैसे असलेल्या मुलांशी लग्न करतात . हा निर्णय यासाठी घेतात कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेला मुलगा असेल तर मुलींना असं वाटत असतं की आपलं भविष्य चांगलं राहील. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचं आपल्यावर प्रेम नसेल तरी हरकत नाही पण आर्थिकदृष्या सबळ असावा. म्हणून मुली इच्छा नसताना लग्न करण्याचा निर्णय घेतात.
घरात सगळ्यात मोठ्या असतील
भारतातील सगळ्यात जास्त नुकसानाच सामना घरातील मोठ्या मुलाला करावा लागतो. कारण सर्वाधिक घरातील मोठ्या मुलांना लग्नासाठी दबाव टाकला जातो. लहान्याचं आधी केलं तर मोठ्याच्या लग्नाचं काय, लोक काय म्हणतील... अशा प्रसंगाचा सामना करावा लागतो. त्यामुळे लग्न करण्यासाठी प्रवृत्त होऊन अनेक मुलं मनाविरूध्द होकार देतात.
लग्न एक परंपरा
काही लोकांच्यामते लग्न ही केवळ एक परंपरा असते. पण असे अनेक लोक आहेत जे लग्न म्हणजे आयुष्यात एक जबाबदारी असल्यासारखं पूर्ण करतात. कारण त्यांची लग्न करण्याची इच्छा जराही नसते. ( हे पण वाचा-'असा' पार्टनर असेल तर आयुष्य वाढतं आणि मेंदूची क्षमताही, रिसर्चमधून खुलासा... )
सगळ्या मित्रांची लग्न झाली असल्यामुळे
ठरावीत कालावधीनंतर मुलांच्या किंवा मुलींच्या सगळ्या बॅचमेट्सची लग्न होत असतात. तेव्हा फारचं वय नसेल तरी त्यांच लग्न झालं आपलं कधी होणार असा प्रश्न मुलांच्या काळजीचं कारण ठरत असतो. त्यामुळे जे येईल ते स्थळ पाहून मुलं मनाविरूद्ध लग्न करण्याचा निर्णय घेतात. (हे पण वाचा-संशयी पार्टनरला हॅण्डल करण्याची 'ही' ट्रिक वापराल तर डोक्याचा ताप होईल कमी )