कसं ओळखाल तुमचा पार्टनर धोका तर देत नाहीये ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:02 PM2019-12-07T15:02:36+5:302019-12-07T15:10:17+5:30
रिलेशनशीप हे विश्वासाच्या आधारावर पुढे जात असत. पण काहीवेळा मुलांकडून अथवा मुलींकडून काही गोष्टींमध्ये गैरसमज झाल्याने नात तुटतं.
रिलेशनशीप हे विश्वासाच्या आधारावर पुढे जात असत. पण काहीवेळा मुलाकडून अथवा मुलीकडून काही गोष्टींमध्ये गैरसमज झाल्याने नात तुटतं. तर काहीवेळा गोष्टी जाणिवपूर्वक लपवून ठेवल्याने नात्यांमध्ये दुरावा येतो. कोणत्याही नात्यात मिळालेला धोका पचवणं अवघड असतं. जर रिलेशनशीपमध्ये असताना विश्वासघात झाला तर नातं तुटायला फार वेळ लागत नाही.
लग्नाआधी किंवा लग्नानंतर कधीही तर तुमच्या पार्टनर कडून तुमचा विश्वासघात झाला. तर अख्ख आयुष्य खराब होऊ शकत. आणि आयुष्यात नंतर कोणावरही विश्वास ठेवावस वाटत नाही. जर तुम्हाला पार्टनर धोका देत असेल. तर आपली मानसीक स्थीती खूप कमजोर होते. अनेकदा डिप्रेशनचा सामना करावा लागतो. तर मग जाणून घ्या तुम्हाला तुमचा पार्टनर धोका देतोय की नाही ते कसं ओळखायचं.
पार्टनर प्रेम आहे असं दाखवत असेल तरी तुमच्या नात्याला काही नाव देण्यास नकार देत असेल. या मुद्यावरुन तुमच्यात वाद झाल्यावर, आपल्या नात्याला एखादं नाव देण्याची काय गरज आहे. असं उत्तर देत असेल तर हे तुमच्या रिलेशनशीपसाठी योग्य नाही. तुमच्या नात्याला नाव देण्याचं पार्टनर नाकारत असेल तर त्या व्यक्तीला तुमच्यात काही रस राहिलेला नाही. किंवा तुमच्यासोबत भविष्यात कायमस्वरुपी राहण्यास ती व्यक्ती इच्छुक नाही.
फावल्या वेळी तुम्ही फोन केला की, ती व्यक्ती खूप प्रेमाने तुमच्याशी बोलते. जेव्हा ती ऑफीसमध्ये किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये असताना तुम्ही फोन केला की तुमच्याशी अपमान केल्यासारख आणि मोजकंच बोलते. जेव्हा आसपास कोणी असताना त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलणं आवडत नाही. अशावेळी नात्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर योग्य निर्णय घेतल्यास मानसीक ताण येणार नाही.