पार्टनरच्या घरच्यांना भेटायला जाताय? तर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:42 PM2019-12-17T13:42:33+5:302019-12-17T13:52:58+5:30

तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल किंवा अरेंज मॅरेज करत असाल तर पार्टनरच्या घरच्या मंडळींना जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Know the things while going to visit a partner's family | पार्टनरच्या घरच्यांना भेटायला जाताय? तर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी 

पार्टनरच्या घरच्यांना भेटायला जाताय? तर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी 

Next

तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल किंवा अरेंज मॅरेज करत असाल तर पार्टनरच्या घरच्या मंडळींना जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही केलेल्या काही शुल्लक चुकांमुळे नातं जुळण्याआधीच तुटू सुध्दा शकतं म्हणून लग्नाविषयी काही निर्णय घेताना घरच्यांना माहीत असणं गरजेचं आहे. तर जाणून घ्या पार्टनरच्या घरच्यांना भेटायला जाताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या. 

१) खोटं बोलू नका

(Imagecredit- younistan)

तुम्हाला लग्न करायची कितीही घाई असेल तरी पार्टनरच्या आई-वडिलांना सगळ्या गोष्टी विश्वासात घेऊन खरं सांगायला हव्यात. जर तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवल्या. आणि ते नंतर लक्षात आल्यास ठरलेलं लग्न मोडू सुध्दा शकतं. जेव्हा पार्टनरच्या घरच्यांना भेटायला जाल तेव्हा सकारात्मक विचार ठेवा. तसंच आधी सगळ्या गोष्टी समजून घ्या. भेटायला जाताना त्यांच्या सोईनुसार सुट्टीच्या दिवशी भेटायला जा. लग्नाची प्लॅनिंग कशी कारायची आहे यावर तुमचं मत मांडा.


२) वागण्या-बोलण्याकडे लक्ष द्या

(Image credit- sohedid)

पार्टनरच्या पॅरेन्टसशी बोलणं चालू असतान मोबाईलचा वापर टाळा. पहिल्याच भेटीत इम्प्रेशन तयार करायचं असेल तर बोलताना नम्रतापूर्वक बोला. जास्त मोठ्यांने हातवारे करत बोलणं टाळा. तिथे गेल्यानंतर संपूर्ण बोलून झाल्याशिवाय निघण्याची घाई करू नका. तुमच्याकडे असलेल्या सेविंग्स किंवा संपत्तीबद्दल  पार्टनरच्या आई-वडिलांना काही सांगू नका. कारण तुमचा पार्टनर सुध्दा या गोष्टी घरच्यांशी शेअर करू शकतो. त्यामुळे स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करू नका. 


३) संस्कार जपा

(Image credit-in4you.com)

पहिल्यांदा पार्टनरच्या आई-वडिलांना भेटताना  त्यांच्या पाया पडायला विसरू नका. त्यातुन तुमचे संस्कार पार्टनरच्या आई-वडीलांना दिसून येत असतात. पार्टनरच्या घरच्यांनी काही प्रश्न विचारले असता जास्त  फिरवून, लांबलचक उत्तर न देता मोजक्या शब्दात आणि महत्वाचं तेवढंच बोला. 

Web Title: Know the things while going to visit a partner's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.