पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तरीही 'या' तीन गोष्टींसाठी कधीही बोलू नका सॉरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:54 PM2020-02-17T12:54:09+5:302020-02-17T13:12:35+5:30
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनरला सॉरी बोलल्याने भांडण मिटतात वैगेरे.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनरला सॉरी बोलल्याने भांडण मिटतात वैगेरे. जरा विचार करा तुम्ही तुमच्या पार्टनरला कितीवेळा सॉरी बोलता. साधं बोलण्या बोलण्या एखादा शब्द चुकीचा बोल्लाच तर सॉरी, पार्टनरला चिडवलं आणि राग आला तर सॉरी, यायला उशीर झाला तर सॉरी. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर तुम्हाला मनापासून सॉरी बोलावसं वाटत असेव तरच बोला. नाहीतर बोलण्याची काही गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही कधीही कोणसा सॉरी म्हणण्याची गरज नाही.
(Image credit-Masterfile)
तुमच्या स्वभावाबद्दल सॉरी बोलू नका
(image credit- pintrest)
तुम्ही जसे आहात लोकांसाठी पण तसेच आहात. म्हणून स्वतःच्या स्वभाव इतरांना आवडत नसेल तर सॉरी बोलू नका. त्यासाठी माफी मागू नका. जसे आहात तसचं राहण्याचा प्रयत्न करा.
आपल्या भावना व्यक्त केल्यावर
जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला सांगितल्यानंतर सॉरी बोलू नका. तुमच्या मनात कोणासाठी काही भावना असतील त्या व्यक्त करताना सॉरी बोलू नका. निसंकोचपणे बोला कारण तुम्ही जर सॉरी बोलाल तर तुमच्या भावनांना काही किंमत उरणार नाही. अनेकजण बोलताना सॉरी पण तुझ वागणं मला नाही आवडलं, सॉरी बट आय लव्ह यू .... अशा पध्दतीने मनातलं बोलताना सॉरी सतत बोलतात. ( हे पण वाचा-Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील!)
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी
प्रत्येकाला स्वतःची स्वप्न असतात. त्यासाठी कोणाचीही माफी मागू नका. म्हणजेच स्वतःती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामात अधिक वेळ द्यावा लागतो. जर त्यावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळ देऊ शकत नसाल आणि त्यावरून जर भांडण होत असतील. तर पार्टनरला समजावून सांगा पण सॉरी बोलू नका. कारण त्यावेळी तुम्ही तुमचं करियर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असता. ( हे पण वाचा-'या' ५ राशीचे लोक कधीही सोडत नाहीत पार्टनरची साथ, वाचा कोणत्या!)