टाइप्स ऑफ कपल्स : यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे कपल आहात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:31 PM2019-11-01T15:31:20+5:302019-11-01T15:31:33+5:30

कोणत्याही नात्यामध्ये भांडण हे होतचं. तसेच आपण अनेकदा ऐकतो की, भांडल्याने प्रेम वाढतं. अनेकदा नात्यामध्येही प्रश्न उपस्थित होतो की, नक्की हे प्रेम आहे की, अट्रॅक्शन?

Know which kind of couple you are | टाइप्स ऑफ कपल्स : यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे कपल आहात?

टाइप्स ऑफ कपल्स : यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे कपल आहात?

googlenewsNext

कोणत्याही नात्यामध्ये भांडण हे होतचं. तसेच आपण अनेकदा ऐकतो की, भांडल्याने प्रेम वाढतं. अनेकदा नात्यामध्येही प्रश्न उपस्थित होतो की, नक्की हे प्रेम आहे की, अट्रॅक्शन? जर तुमच्यासोबतही असेच काही प्रॉब्लेम्स होत असतील किंवा तुम्ही तुमच्या नात्याबाबत कन्फ्यूज्ड असाल तर आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कशाप्रकारचे कपल्स असतात हे समजणं शक्य होईल. 

एकमेकांसाठी बनलेलं परफेक्ट कपल 

काही कपल्स असे असतात. ज्यांना पाहिल्यावर असं वाटतं की, हे एकमेकांसाठी बनले आहेत. फक्त आपल्यालाच नाहीतर यांनाही काहीसं असचं वाटतं. हे कपल्सआधी एकमेकांचे सर्वात चांगले मित्र असतात. प्रत्येक गोष्ट अगदी सहजपणे एकमेकांशी बोलतात. एकमेकांना सजेशन देतात. यांना कधीच दुसऱ्या कोणाची गरज भासत नाही. 

ऑन-ऑफ मूड असणारे कपल्स 

या कपल्सचा मूड कधी ऑन तर कधी ऑफ असतो. म्हणजेच, हे नेहमी एकसारख्या मूडमध्ये राहत नाही. या व्यक्ती ब्रेकअप करतात तर पुढच्या दिवशी एकत्र कॉफी पितात. या दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरिही हे एकमेकांशी अगदी सहजपणे बोलतात. 

लहानपणीचं प्रेम 

लहानपणी अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागते आणि त्या व्यक्तीसोबत मैत्रिचं नात पुढे आणखी वाढतं. अनेकदा असं वाटतं की, ज्या दोन व्यक्ती आहेत, त्यांच्यात फक्त मैत्रिचं नातं नाहीतर प्रेमाचं नातं आहे. 

प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत

हे कपल्स प्रेमामध्ये कोणाचीच पर्वा करत नाहीत. तसेच आपलं प्रेम व्यक्त करताना ते कोणताही विचार करत नाहीत. अनेकदा यांना पाहून इतर लोकांना आपलाही पार्टनर असाच पाहिजे असं वाटू लागतं. 

हे कपल्स फार कमी भेटतात

या व्यक्ती एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. हे प्रचंड भांडतात, परंतु, एकमेकांवर प्रेमही तेवढचं करतात. एकमेकांच्या आनंदासाठी हे आपलं नातं तोडण्यासाठीही तयार असतात. 

प्रेमही आणि शारीरिक गरजांसाठी

एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमाचं नातं असणं किंवा शारीरिक गरजांसाठी एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात असणं एकच गोष्ट असल्याचं मानलं जातं. अनेक असे कपल्स आहेत, जे आपल्या गरजा एक्सेप्ट करून आपलं नातं पुढे वाढवतात. खास गोष्ट म्हणजे, हे कपल्स एकमेकांकडून फारशा अपेक्षा ठेवत नाहीत. 

नशीबचं यांचं नातं जोडतं 

अनेक असे कपल्स आहेत, ज्यांना नशिब एकत्र आणतं. या कपल्सबाबत सांगायचं झालं तर शाहरूख खानच्या एका चित्रपटातील संवाद आठवतो. 'किसी चीज को अगर चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है.' या कपल्सना हे वाक्य अगदी तंतोतंत लागू होतं. 

ऑफिस कपल्सचं प्रेमचं वेगळं 

अनेकदा असं दिसून येतं की, एकाच ऑफिसमध्ये काम करणारे कपल्स असतात. पण आपल्या प्रेमाची कबुली ते कधीच देत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, या व्यक्ती हे आपल्या पार्टनरपेक्षा आपल्या कामाला जास्त प्राधान्य देतात. तर याचा अर्थ असा आहे की, कपल्सना आपलं काम आणि आपलं नातं बॅलेन्स करायचं असतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Web Title: Know which kind of couple you are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.