दाढीवाले पुरुष महिलांना का अधिक पसंत असतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:47 AM2018-11-15T11:47:15+5:302018-11-15T11:47:37+5:30
सध्या पुरुषांमध्ये बीअर्ड लूकची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. त्यात महिलांनाही पुरुषांचा बीअर्ड लूक पसंत पडत आहे, म्हणून अलिकडे पुरुष दाढी वाढवण्यावर भर देत आहेत.
सध्या पुरुषांमध्ये बीअर्ड लूकची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. त्यात महिलांनाही पुरुषांचा बीअर्ड लूक पसंत पडत आहे, म्हणून अलिकडे पुरुष दाढी वाढवण्यावर भर देत आहेत. त्यासाठी वाट्टेल ते उपाय करतानाही पुरुष दिसतात. पण महिलांना पुरुषांचा बीअर्ड लूक का आवडतो? या प्रश्नाचं उत्तर मात्र अनेकांना माहीत नसेल. किंवा याकडे कुणी फारसं लक्षही देत नाहीत. पण दाढीचं हे प्रकरण महिलांच्या मनाशी जुळतं. नुकत्यात करण्यात आलेल्या एका शोधातून हे समोर आलं आहे की, महिलांना दाढी असलेले पुरुष अधिक पसंत असतात. तसेच यातून याचं कारणेही देण्यात आली आहेत.
काय सांगतो शोध?
दाढी असलेले पुरुष महिलांना जास्त पसंत असतात. 'जर्नल ऑफ एवॉल्यूशनरी बायोलॉजी' च्या अभ्यासानुसार ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात ८५०० महिलांना दाढी असलेल्या आणि दाढी नसलेल्या पुरुषांना रेटींग करण्यास सांगितले गेले होते. यातील काही पुरुषांचे फोटो हे शेवींग केल्याच्या ५ दिवसांनंतरचे होते. तर काहींचे फोटो १० दिवसांनंतरचे होते आणि काहींचे शेविंगच्या ४ आठवड्यानंतरचे होते.
काय निघाला निष्कर्ष?
या अभ्यासातून आढळलेले निष्कर्ष अंचबित करणारे होते. जेव्हा महिलांना त्यांच्यासाठी बॉयफ्रेन्ड म्हणून या पुरुषांमधून निवड करण्यास सांगण्यात आले, तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी दाढी असलेल्या पुरुषांना प्राधान्य दिलं. जास्त महिलांनी शेविंगच्या १० दिवसांनंतरच्या फोटोंना अधिक पसंती दिली. त्यानंतर फुल बीअर्डला महिलांनी प्राधान्य दिलं.
काय आहे कारण?
या अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, पुरुषांची चांगली जॉ लाइन महिलांना अधिक आकर्षित करते. पुरुषांच्या दाढीला त्यांचं वय आणि पुरुषत्व यांच्याशी जोडून बघितलं जात आलं आहे. एका दुसऱ्या अभ्यासानुसार, लॉंग टर्म रिलेशनशिपसाठी महिला दाढी असलेल्या पुरुषांना जास्त पसंती देतात. कारण याने त्यांना हे नातं सामाजिक रुपाने जास्त यशस्वी होण्याचा संकेत मिळतो.