ब्रेकअपनंतर पार्टनरच्या मित्र-मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट ठेवायचा की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:20 PM2020-01-31T13:20:02+5:302020-01-31T13:33:13+5:30

ब्रेकअपनंतर आपल्या एक्स पार्टनर सोबत बोलायचं की नाही  तिच्याशी किंवा त्याच्याशी संपर्क ठेवायचा की नाही

Know will you do stay in contact of partner or not | ब्रेकअपनंतर पार्टनरच्या मित्र-मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट ठेवायचा की नाही?

ब्रेकअपनंतर पार्टनरच्या मित्र-मैत्रिणींशी कॉन्टॅक्ट ठेवायचा की नाही?

Next

ब्रेकअपनंतर आपल्या एक्स पार्टनर सोबत बोलायचं की नाही.  तिच्याशी किंवा त्याच्याशी संपर्क ठेवायचा की नाही. हे स्वतंत्रपणे आपल्या मनावर असतं. आपल्याला जर एक्ससोबत नातं तोडायचं असेल किंवा तिच्यासोबत एक फ्रेन्ड म्हणून राहायचं आहे तर तुम्ही राहू शकता. 

अनेकदा गर्लफ्रेंडसोबत तुम्ही ट्रीप किंवा आऊटींगला जात असता तसंच पार्टीला जात असता. तेव्हा तुमची पार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत  मैत्री होत असते. नंतर चांगलं बॉन्डींग सुद्धा होत असतं. पण जर तुमचं ब्रेकअप झालं असेल तर पार्टनरच्या मित्रांशी बोलायचं  की नाही.  असा प्रश्न आपल्याला पडत असतो.  आज आम्ही तुम्हाला एक्स पार्टनरच्या फ्रेन्ड्स सोबत राहायचं की नाही. हे सांगणार आहोत. 

तुम्हाला पॅचअप करायचं असेल 

काहीवेळा पार्टनर सोबत भांडण झाल्यानंतर ब्रेकअपपर्यंत गोष्ट जाते. पण काहीवेळा आपल्याला आपला पार्टनर आयुष्यात परत हवा असतो. असं जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर तुम्ही आपल्या पार्टनरच्या मित्रमैत्रिणींशी मैत्री ठेवू शकता. कारण  कॉमन फ्रेन्ड्सच्या संपर्कात राहिल्यामुळे  तुम्हाला तुमच्या एक्सबद्दल माहिती मिळू  शकते. आणि तुम्ही पॅचअप सुद्धा करू शकता. 

मुव्ह ऑन करायचं असेल

जर तुम्हाला तुमच्या एक्स पार्टनरपासून खूप लांब जायचं आहे. म्हणजेच MOVE ON  करायचं असेल तर तुम्ही  पार्टनरच्या फ्रेन्ड्स सोबत काही संपर्क ठेवू नका. कारण जर तुम्ही त्यांच्या संपर्कात रहाल तर  जुन्या आठवणी येण्याची शक्यता असते. तसंच  मानसीकरित्या तुम्ही डिस्टर्ब सुद्धा होऊ शकता. म्हणूनच तुम्ही पार्टनरच्या फ्रेन्डसना भेटणं टाळा. सोशल मिडीयावर जर तुमचे कॉमन फ्रेन्ड्स असतील तर त्यांच्यापासून लांब रहा. कारण त्यामुळे  परत आठवण येण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-पार्टनरच्या राशीवरून ओळखा कसा आहे 'त्यांचा' स्वभाव)

ब्रेकअपनंतर कॉमन फ्रेन्ड्सशी नातं तोडणं फारसं चांगल दिसत नाही. त्यासाठी तुम्ही आपल्या पार्टनरच्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांगण्याचा प्रयत्न करा की ब्रेकअप झाल्यामुळे तुम्हाला स्वतःला वेळ देण्यासाठी काही काळ एकटं राहायचं आहे. त्यामुळे  नातं न तोडता सुद्धा तुम्ही स्वतःचा हेतू साध्य करू शकता. अचानक तुमच्या पार्टनरने तुमच्याशी बोलणं बंद केलं असेल तर तिच्या किंवा त्याच्या मित्रांना भेटून आपली स्थिती सांगण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुमच्या गर्लफ्रेंडला काहीवेळ एकटं राहायचं असेल तर  काही काळानंतर फ्रेन्डसच्या माध्यामातून तुमचं बोलणं परत होऊ शकतं. ( हे पण वाचा-मुलांना वयाने मोठ्या असलेल्या मुली आवडण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?)

Web Title: Know will you do stay in contact of partner or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.