जाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:57 AM2018-02-05T11:57:48+5:302018-02-05T17:27:48+5:30
पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत.
Next
प रत्येक स्त्रीला एका महत्त्वाकांक्षी पुरुषाची आस असते, जो तिला समजून घेईल, तिच्यावर प्रेम करेल आणि त्याच वेळी तिची काळजी देखील घेईल. तर दुसरीकडे, पुरुषाला अशी स्त्री हवी असते, जी व्यवहारी, आत्मविश्वास असलेली आणि प्रगल्भ असेल. अनेक पुरुष त्यांच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी संबंध जुळवणे आणि ते निभावणे पसंत करू लागले आहेत. कारण, अशा स्त्रिया अधिक प्रगल्भ आणि जबाबदार व्यक्ती असतात, असे त्यांना वाटते. अशा नात्याचे एक उदाहरण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील रिश्ता लिखेंगे हम नया या प्राइमटाइम मालिकेत बघायला मिळते आहे. ही रतन (रोहित सुचंती) आणि दीया (तेजस्वी प्रकाश) यांची एक अद्भुत, आजवर न पाहिलेली अशी कहाणी आहे. यात दीया रतनपेक्षा मोठी आहे. या मालिकेने पुरुष हा स्त्रीचा रक्षणकर्ता असतो या पारंपरिक विचारसरणीला शह दिला आहे आणि त्याच्या अगदी विपरीत कथानक मांडले आहे. पण अशा नात्यांचे स्वतःचे असे काही फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. या मालिकेच्या निमित्ताने जाणून घेऊया पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे काही फायदे आणि तोटे
पुरुषाने त्याच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे -
वयाने अधिक असलेल्या स्त्रिया अधिक प्रगल्भ असतात. त्या अविचारी गोष्टींसाठी किरकिर करत नाहीत, त्याचे स्तोम माजवत नाहीत किंवा त्यात रसही घेत नाहीत.
ज्ञान, कारकीर्द, आर्थिक व्यवस्थापन, निर्णय घेणे इत्यादी बाबतीत त्यांची समज अधिक चांगली असते आणि त्या अधिक अनुभवी असतात.
वयाने मोठ्या असलेल्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेल्या असतात आणि आपल्या पतीवर अवलंबून नसतात. उलट आर्थिक संकटात आपल्या पतीला मदतच करतात. वेळेचे व्यवस्थापन, इतरांना काम सोपविणे आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामात बारकाईने लक्ष घालणे ही कौशल्यं त्यांच्यात असतात.
पुरुषाने त्याच्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे तोटे -
कुटुंब, समाज आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रीशी विवाह केल्याबद्दल सोसावी लागणारी अवहेलना.
अशा नात्याचे आयुष्य त्यांच्या एकमेकांशी असलेल्या अनुरूपतेवर अवलंबून असते. हे नाते स्थिर ठेवण्यासाठी दोघांच्यात एखादा सामाईक दुवा शोधणे हे वाटते तितके सोपे नसते.
त्याने तिच्या अपेक्षा पूर्ण न केल्यास ती निराश होऊ शकते.