वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 12:30 PM2018-02-06T12:30:33+5:302018-02-06T12:59:23+5:30

सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

learn life lessons from parents life lessons from parents | वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

वाईट काळात सुखी राहायचंय? ...तर आई-वडिलांकडून शिका या गोष्टी!

googlenewsNext

मुंबई - कुटुंब आणि समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती आपल्यापद्धतीने आयुष्य जगत असतो, परंतु सुखी आणि यशस्वी आयुष्य जगणे वेगळी गोष्ट आहे. यासाठी विविध गोष्टींकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. आई-वडिल आपलं नातं कशाप्रकारे जपतात. त्यांच्या नात्यामध्ये कटुता कधीच दिसत नाही. ते दोघेही एक दुसऱ्याबद्दल मनात आदार ठेवतात. त्यांची बोलण्याची रित. त्याचप्रमाणे एकदुसऱ्याला प्रत्येक अडचणीमध्ये कशाप्रकारे मदत करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहे. आपण आपल्या आई-वडिलांकडून कोणत्या गोष्टी शिकल्यास आपल्याला जिवन जगत असताना उपयोग होईल. सुखी होण्याचा पुर्ण मार्ग यातून मिळणार नाही. पण वाईट काळात सुखी कसं रहायचं याचा उपदेश नक्कीच मिळेल. 

आपल्याला एकमेंकाच्या नात्यांची गरज असते. जेणेकरुन आपण प्रेम अनुभवू शकू. आपल्याला समजावं की आपल्याला हे समजेल की आपल्याला कोणाची तरी गरज आहे. जर तुमचे एकमेंकावर प्रेम असेल तर लग्नानंतर काही वर्षानी ते आधिक फुलतं. एकमेंकाना समजुन घेतात. भूतकाळातील गोष्टी लग्नानंतर विसरुन जा. त्यावर पडदा टाका. आई-वडिलांप्रमाणे नात्याला जपायला शिका. 

कोणतंच नाते परफेक्ट नसते, आपला जोडीदार, त्याची/तिची सवयी, परिवार किंवा परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे नसते. अशा गोष्टींना धरुन बसू नका. लक्षात ठेवा या सर्व गोष्टी काळानुरुप बदलतात. 

आपण आपल्या मनाप्रमाणे जगू इश्चितो पण नात्यांमध्ये ही गोष्ट लागू होत नाही. कित्येक वेळा आपल्याला एक पाऊल मागे घ्यावे लागते. नात्यात कमीपणा घेण वाईट नाही. कॉम्प्रोमाइज केल्याने आपल्या नात्याला आधिक बळकटी मिळते. 

आपला जोडीदार आपल्यासाठी महत्वाचा असतो, यामध्ये कोणतेही दुमत नाही. पण आपल्या मित्रपरिवारांसाठीही वेळ काढा. आपण आपल्या नात्याच्या वाईट काळात असेल त्यावेळी हेच आपल्या मदतीला धावून येतात. 

ज्यावेळी आपण कोणत्या रिलेशनमध्ये येतो त्यावेळी आपल्याला जोडीदाराची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते. काळानुरुप जोडीदाराच्या ह्याच सवयी आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. आणि आपण त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. पण हे आपल्या नात्यासाठी त्रासदायक ठरु शकतात. आपल्या जोडीदाराच्या कमतरतेला स्विकारा. स्वत:ला आठवण करुन द्या की कमतरतेसोबत आपल्याला जोडीदारावर प्रेम झालं होतं. 

चुका सर्वजणच करतात. प्रत्येक नात्यात वाईट काळ येतो. आपला वाईट काळ संपल्यावर झालेल्या चुका घेऊन न बसता त्या विसरुन जाव्यात. नव्या उमेद्दीनं नात्याला जोडा. वाद करुन त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर आणने किंवा बोलूण दाखवणं तुमच्या नात्यात कटुता आणू शकते. झालेल्या गोष्टी विसरायची कला तुमच्याकडे असायला हवी. ही गोष्ट आत्मसात करायला वेळ लागेल पण आपल्याला जिवनात महत्वाची आहे. 

Web Title: learn life lessons from parents life lessons from parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.