Love : "हे" प्रश्न ऐकून प्रत्येक मुलगी होते नाराज !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 08:17 AM2017-10-03T08:17:21+5:302017-10-03T13:47:21+5:30

असे काही ठराविक प्रश्न आहेत, कि जे मुलींना विचारल्यानंतर त्यांचा राग अनावर होतो. कारण त्यांना या प्रश्नांचे उत्तर देणे अजिबात आवडत नाही. जाणून घेऊया कि त्यांना कोणते प्रश्न ऐकणे अजिबात आवडत नाही.

Love: Angered every girl who had heard the "this" question! | Love : "हे" प्रश्न ऐकून प्रत्येक मुलगी होते नाराज !

Love : "हे" प्रश्न ऐकून प्रत्येक मुलगी होते नाराज !

Next
लींसोबत बोलताना प्रत्येक मुलाने काळजी घ्यायलाच हवी कारण त्या कोणत्या गोष्टीने चिडतील याचा काहीही अंदाज नसतो. विशेषत: असे काही ठराविक प्रश्न आहेत, कि जे मुलींना विचारल्यानंतर त्यांचा राग अनावर होतो. कारण त्यांना या प्रश्नांचे उत्तर देणे अजिबात आवडत नाही. जाणून घेऊया कि त्यांना कोणते प्रश्न ऐकणे अजिबात आवडत नाही. 

* लग्न कधी करशील?  
कोणत्याही अविवाहित मुलीला हा प्रश्न कधीही विचारु नये की, तु लग्न कधी करशील? विशेष म्हणजे मुली प्रत्येकाकडून हा प्रश्न वारंवार ऐकून खूपच बोअर होऊन जातात. यामुळे कोणतीही मुलगी हा प्रश्न ऐकून चिडून जाते.  
 
* एक्स बॉयफ्रेंडच्या बाबतीत 

मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या बाबतीत ऐकणे अजिबात ऐकणे पसंत करत नाही. यामुळे त्यांना मागच्या सर्व गोष्टी आठवतात. यासाठी त्या या प्रश्नापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.  

* करिअरच्या बाबतीत प्रश्न
मुलींना आपल्या करिअरच्या बाबतीत कोणतीच कमेंट ऐकणे आवडत नाही. याशिवाय त्यांना त्यांचे कपडे आणि मेकअपसंबंधीत प्रश्नदेखील अजिबात आवडत नाही.
   
* तु अजून सिंगलच आहे?  
मुलींना हा प्रश्न अजिबात आवडत नाही शिवाय याचे उत्तरही देणे त्यांना पसंत नसते. आपल्या पर्सनल लाइफशी संबंधीत प्रश्न ऐकणे तिला अजिबात आवडत नाही. यामुळे त्यांना असा प्रश्न अजिबात विचारु नये.  

* अन्य मुलींबाबत विचारणे     
त्यांना कधीही अन्य मुलगी किंवा तिच्या मैत्रिणीविषयी विचारु नये. यामुळे त्यांना असे वाटते की, आपण आपण दुसऱ्या मुलींमध्ये इंट्रेस्टेड आहात. याने आपल्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो. 

Web Title: Love: Angered every girl who had heard the "this" question!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.