​मार्च टॉप 5 ट्रेंडिंग यूट्यूब व्हिडियोज्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2016 05:05 AM2016-04-04T05:05:38+5:302016-04-03T22:07:17+5:30

मार्च महिन्यात यूट्यूबवर कोणते व्हिडियो हीट झाले आणि सर्वात जास्त पाहिले गेले याची यादीच तुम्हाला देत आहोत.

March Top 5 Trending YouTube Videos | ​मार्च टॉप 5 ट्रेंडिंग यूट्यूब व्हिडियोज्

​मार्च टॉप 5 ट्रेंडिंग यूट्यूब व्हिडियोज्

googlenewsNext
र्च महिना कसा आला आणि कसा निघून गेला हे कळलेसुद्धा नाही ना? सगळा महिना ‘मार्च एन्ड’ करत करत टॅक्स रिटर्न, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि दुष्काळाच्या बातम्यांनी गाजवला. दरम्यान इंटरनेटवरदेखील अनेक घडामोडी घडल्या.

मार्च महिन्यात यूट्यूबवर कोणते व्हिडियो हीट झाले आणि सर्वात जास्त पाहिले गेले याची यादीच तुम्हाला देत आहोत. मग एकाच झटक्यात मार्च महिन्यातील पुढील टॉप 5 ट्रेंडिंग व्हिडियो पाहून एंजॉय करा.

1. ‘कॅप्टन अमेरिका : सिविल वॉर’ ट्रेलर


कॅप्टन अमेरिका या सुपरहीराच्या या तिसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर मार्च महिन्यात सर्वात जास्त पाहण्यात आला. आतापर्यंत 5.6 कोटींपेक्षा जास्त व्यूवज् त्याला मिळाले. त्यापैकी 2.1 कोटी व्यूवज् तर पहिल्या 24 तासातच मिळाले होते.

2. ‘गेम आॅफ थ्रोन्स : सीझन 6’ ट्रेलर


जगभरातील लाखो चाहत्यांचा गेल्या महिन्यात किती तरी वेळ ’गेम आॅफ थ्रोन्स’च्या सहाव्या सीझनचा ट्रेलर परत परत पाहण्यात गेला असेल. यावेळी नेमके काय होणार याची उत्सुकता आता शिगेला पाहेचली आहे. आतापर्यंत त्याला 2.8 कोटींपेक्षा जास्त व्यूवज् प्राप्त झाले आहेत.

3. ‘घोस्टबस्टर्स’ ट्रेलर


दिग्दर्शक पॉल फेग ‘घोस्टबस्टर्स’द्वारे संपूर्णत: महिला कलाकारांना घेऊन या प्रसिद्ध पॅरानॉरमल कॉमेडी सीरीजचा पुढचा चित्रपट 15 जुलै रोजी घेऊन येतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला 2.78 कोटी व्यूवज् मिळाले आहेत.

4. लास्ट विक टूनाईट विथ जॉन आॅलिव्हर : मेक डोनल्ड ड्रम्फ अगेन


सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूकीचे नामांकन मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये घमासान शाब्दिक देवाणघेवाण सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाकडून इच्छूक उमेदवार डोनल्ड ट्रम्प त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याच्यावर टीका करणाºया जॉन आॅलिव्हरच्या या व्हिडियोला 2.35 कोटी व्यूज प्राप्त झाले आहेत.

5. कारपूल कराओके : जेनिफर लोपेझ एडिशन


‘लेट लेट शो विथ जेम्स कॉर्डेन’ या कार्यक्रमातील कारपूल कराओकेच्या क्लिपला यूट्यूबवर चांगलीच पसंती मिळाली. 29 मार्च रोजी अपलोड होऊनदेखील हा व्हिडियो पहिल्या पाचमध्ये पोहचला आहे. आतापर्यंत त्याला 2.27 कोटी व्यूवज् मिळाले आहेत.

Web Title: March Top 5 Trending YouTube Videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.