श्रीमंतीपेक्षा अधिक आनंद देते लग्न, अनुभवांनुसार खर्च करणारे असतात अधिक खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 02:51 PM2019-05-26T14:51:06+5:302019-05-26T14:57:07+5:30
आपल्या आयुष्यात आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. कोण कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होईल सांगता येत नाही.
आपल्या आयुष्यात आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. कोण कोणत्या गोष्टीमुळे आनंदी होईल सांगता येत नाही. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्समध्ये छापण्यात आलेल्या सर्वेनुसार, उत्तम आरोग्यानंतर लोक जर सर्वात आनंदी होत असतील तर ते लग्नामुळेच. विचारात पडला असाल ना? मानवाला आनंद देण्याच्या कारणांमध्ये पैशांच्याही आधी लग्नाचा क्रमांक लागतो. जेव्हा लोकांना हे विचारण्यात आलं की, त्यांचं जीवन कोणत्या कारणामुळे सफल झाल्यासारखं वाटतं? तेव्हा लोकांनी पैशांच्या आधी लग्नाचं नाव घेतलं.
सर्वेमध्ये लग्न झालेल्या लोकांचे लाइफ सॅटिस्फॅक्शन 9.9 टक्क्यांनी जास्त अशा लोकांच्या पार्टनरचा मृत्यू झाला आहे. घटस्पोटीत व्यक्तींपेक्षाही लग्न झालेल्या व्यक्ती जास्त संतुष्ट होते. हा सर्वे ब्रिटनमध्ये 2017 ते 2018 वर्षामध्ये करण्यात आला होता. दरम्यान, 2011 ते 2012मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये लोकांनी आपल्या जॉबला आनंदाचं सर्वात मोठं कारण सांगितलं होतं.
सर्वेमध्ये हेदेखील समोर आालं होतं की, लोकांचं संतुष्ट असण्याचा एक फॅक्टर त्यांचं वयही आहे. तरूण लोक आपल्या आयुष्यात जास्त खुश असतात. तेच वयाच्या 40व्या वर्षी लोक आपल्या आयुष्यात सर्वात कमी खूश होते. अशा व्यक्ती ज्या एखाद्या घराचे मालक आहेत. ते भाड्याने राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त खूश आहेत. सर्वेमध्ये हे समोर आलं की, ज्या व्यक्ती आपल्या अनुभवांवरून खर्च करतात, त्या सर्वात जास्त खूश असतात. जसं जी व्यक्ती हॉटेल किंवा फिरण्यावर खर्च करतात. ते इन्शॉरन्स, मोबाइल इत्यादीवर खर्च करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त खूश आहेत.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.