'या' सवयी असणाऱ्या मुलींशी चुकूनही करू नका लग्न; नाहीतर भांडणातच रहाल मग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 05:56 PM2020-05-24T17:56:17+5:302020-05-24T18:00:38+5:30
अशा काही सवयी असलेल्या मुलींसोबत न राहिलेलं बरं असं तुम्हाला वाटू शकतं.
लग्न ही एक मोठी जबाबदारी असते. प्रत्येकालाच असं वाटत असतं की, वैवाहिक आयुष्य खूप रोमँटीक आणि चांगलं असावं. लग्न करताना तुमच्या पार्टनरवर कोणताही दबाव तर नाहीतर ना ही गोष्ट लक्षात घेणं सुद्धा तितकंच मह्त्वाचं असतं. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या वागण्याच्या पद्धतीबाबत काही टिप्स सांगणार आहोत. अशा काही सवयी असलेल्या मुलींसोबत न राहिलेलं बरं असं तुम्हाला वाटू शकतं. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सवयी.
बोलण्यात कडवटपणा असणं
अनेक मुलींना तिरकस बोलण्याची किंवा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिरकसपणे देण्याची सवय असते. अशी सवय असलेल्या मुली नेहमी वादाला तोंड फुटण्याचं कारण ठरू शकतात. कारण त्यामुळे निगेटिव्ह वातावरण तयार होतं. म्हणून अशा मुलीशी लग्न करण्याआधी विचार करा.
आकर्षणाचा केंद्रबिंदू
अशा खूप मुली असतात त्यांना नेहमी इतरांचं अट्रॅकशन हवं असतं. त्यासाठी त्या कोणतीही कृती करतात. इतर मुलींची प्रगती त्यांना पाहावली जात नाही. जेलस होण्याची भावना त्याच्यात असते. त्यांना सतत असं वाटत असतं की लोकांच आपल्याकडे लक्ष असायला हवं.
स्वार्थीपणा
अनेकांचं स्वतःवर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम असतं. पण लग्न झाल्यानंतर पार्टनरच्या मनाचा विचार करणं, पार्टनरचं मत विचारात घेणंही गरजेचं असतं. असं झालं नाही तर नात्यात दुरावा वाढत जातो. हेच कारण ब्रेकअपचं ठरू शकतं. म्हणून सतत स्वतःचाच विचार करत असलेल्या मुलीसोबत नात्यात राहू नका.
महागड्या वस्तूंच आकर्षण
(image credit- elitedaily.com)
तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल तर अनेकदा आपली हौस मौज पूर्ण करत असताना महिला आपल्या पार्टनरने पैसे कमावण्यासाठी केलेले कष्ट आणि मिळकत विचार न घेता हवं तसं वागतात. त्यामुळे ओढाताण होऊ शकते. यापेक्षा तुम्ही आर्थिक बाबींची जाणीव असलेल्या मुलीसोबत लग्न करा.