आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला 'या' ८ गोष्टी खोट्या सांगतात पुरुष, समजल्यावर होतात वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 05:15 PM2022-08-05T17:15:10+5:302022-08-05T17:33:21+5:30

पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर ते बायको, गर्लफ्रेंड किंवा महिला सहकाऱ्याशी काही वेळा खोटं बोलतात. अर्थात यातील काही गोष्टी खूपच कॉमन असल्याचं पाहायला मिळतं. पण यामुळे गैरसमज, वाद निर्माण होतात.

men lies this eight 8 things to their girlfriend or wife know which | आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला 'या' ८ गोष्टी खोट्या सांगतात पुरुष, समजल्यावर होतात वाद

आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडला 'या' ८ गोष्टी खोट्या सांगतात पुरुष, समजल्यावर होतात वाद

Next

कोणत्याही नात्यात (Relation) प्रेम, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. प्रियकर-प्रेयसी अथवा पती-पत्नीच्या नात्यात तर या गोष्टी आवश्यक मानल्या जातात. पण अनेकदा गैरसमज, खोटं बोलल्यामुळे या नात्यावर परिणाम होतो. विश्वासाला तडा गेल्यास नातं तुटण्याची शक्यता असते. महिला, पुरुष किंवा लहान मुलं असे सर्व जण केव्हातरी खोटं बोलतात. खोटं बोलणं हा मानवी स्वभाव (Human Nature) आहे. एखाद्या व्यक्तीपासून सत्य लपवून ठेवण्यासाठी किंवा चुका झाकण्यासाठी खोटं बोललं जातं.

काही लोकांना तर विनाकारण खोटं बोलण्याची सवय असते. रिलेशनशिपमध्ये (Relationship) बऱ्याचदा जोडीदाराला खूश करण्यासाठी खोटं बोललं जातं. पण असं खोटं बोलणंप्रसंगी अंगलट येऊ शकतं. यामुळे नातं तुटू शकतं. पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर ते बायको, गर्लफ्रेंड किंवा महिला सहकाऱ्याशी काही वेळा खोटं बोलतात. अर्थात यातील काही गोष्टी खूपच कॉमन असल्याचं पाहायला मिळतं. पण यामुळे गैरसमज, वाद निर्माण होतात. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

अनेकांना खोटं बोलण्याची सवय असते. खोटं बोलणं हा खरं तर मानवी स्वभाव आहे. पण ही सवय वाईट असते. पुरुष अनेकदा कोणत्याही कारणासाठी पत्नी (Wife), गर्लफ्रेंडशी (Girlfriend) खोटं बोलतात. यामागे काही कारणं असू शकतात. पण खोटं बोलण्यामुळे नात्यावर परिणाम होऊ शकतो. काही सामान्य खोट्या गोष्टी आहेत, ज्या पुरुष (Men) सहसा त्यांच्या पत्नी, गर्लफ्रेंड किंवा महिला सहकाऱ्याशी बोलतात. मी एकदाच आणि तेही तुझ्याच प्रेमात पडलो आहे, असं पुरुष अनेकदा त्यांच्या गर्लफ्रेंड अथवा पत्नीशी खोटं बोलतात. आपल्या जोडीदाराला असुरक्षित वाटू नये, तिच्या मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून पुरुष अनेकदा त्यांच्या भूतकाळातल्या गर्लफ्रेंडविषयी बोलणं टाळतात.

कोणत्याही तरुणीचं मन जिंकण्यासाठी पुरुष अनेकदा खोटं बोलतात. लग्नाआधी अजिबात शारीरिक जवळीक करणार नाही, असं ते सांगतात. परंतु, या गोष्टीमुळे तरुणीने होकार देताच आणि रिलेशनशिपमध्ये येताच पुरुष पूर्णपणे बदलून जातात.

तुम्ही चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं असेल, की बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला फोनवर सांगतो की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि फोन डिस्कनेक्ट केल्यावर लगेचच त्याची पार्टी सुरू होते किंवा तो पार्टी प्लॅन करू लागतो. अशा प्रकारचं खोटं पुरुष नेहमीच बोलतात. आपल्या जोडीदाराचा विश्वास जिंकणं हा त्यामागचा उद्देश असतो. लग्नाआधी तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी, माझ्याकडे खूप पैसा (Money) आहे, असं अनेकदा पुरुष खोटं सांगतात. तसंच अनेक विवाहित पुरुष जवळ पैसे असूनही पैसे नसल्याचं आपल्या पत्नीला खोटं सांगतात.

रिलेशनशिपमध्ये महिला नेहमीच पुरुषांना धूम्रपानास मनाई करतात. त्यामुळे जोडीदाराला भेटण्यापूर्वीच काही पुरुष धूम्रपान (Smoking) करतात. पण जेव्हा पुरुषाच्या तोंडाला सिगारेटचा वास येतो, तेव्हा समोरची व्यक्ती धूम्रपान करत होती. त्याच्या धुरामुळे हा वास येतोय, असं खोटं ते जोडीदाराला सांगतात. अनेकदा जोडीदाराचं मन जिंकण्यासाठी, जोडीदार दुःखी होऊ नये यासाठी पुरुष मी केवळ तुझाच विचार करतो, असं खोटं बोलतात. अनेकदा असं पाहायला मिळतं की रिलेशनशीपमध्ये असताना पुरुष जेव्हा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात तेव्हा मी सिंगल असल्याचं ते तिला खोटं सांगतात. समोरची महिला बोलणं बंद करू नये, हा उद्देश असं खोटं बोलण्यामागे पुरुषांचा असतो.

बऱ्याचदा पुरुष त्यांच्या महिला जोडीदारासोबत निवांत बसलेले असतात. त्याचवेळी समोरून एक महिला जाते तेव्हा पुरुष तिच्याकडे निरखून पाहू लागतो. यावर जोडीदारानं हटकलं असता, मी त्या महिलेला पाहत नव्हतो, तर अचानक विचारात मग्न झालो, असं सांगून पुरुष खरं सांगणं टाळतात. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी पुरुष नेहमीच पत्नी किंवा गर्लफ्रेंडला सांगतात. पण यामुळे प्रसंगी नात्यावर परिणाम होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेणंही गरजेचं आहे.

Web Title: men lies this eight 8 things to their girlfriend or wife know which

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.