लठ्ठ महिलेशी बांधा लगीनगाठ, राहा 10 पट अधिक आनंदात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 03:39 PM2018-11-26T15:39:39+5:302018-11-26T15:49:50+5:30
सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काय गरजेचं असतं?.... सामंजस्यपणा, तडजोड करणे, पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे इत्यादी- इत्यादी. या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे.
सुखी वैवाहिक आयुष्यासाठी काय गरजेचं असतं?.... सामंजस्यपणा, तडजोड करणे, पुरेसा वेळे देणे, कमीपणा घेणे, एकमेकांचा सन्मान करणे, विचारांची देवाणघेवाण करणे इत्यादी- इत्यादी. या यादीमध्ये आणखी एका प्रमाणाचा समावेश झाला आहे. हे प्रमाण म्हणजे एखाद्या लठ्ठ महिलेसोबत लग्न केल्यास पुरुष दहा पटीनं आनंदी जगतात आणि हे त्यांच्या सुखी विवाहाचं कारणदेखील ठरू शकतं. ही माहिती आम्ही नाही तर खुद्द संशोधक सांगत आहेत.
वैवाहिक सुखासाठी गोंडस लठ्ठ महिलेसोबत लग्न करणं फायदेशीर ठरू शकते, असा शोध नॅशनल ऑटोनोमस युनिर्व्हसिटी ऑफ मेक्सिकोच्या (Autonomous University of Mexico) संशोधकांनी लावला आहे. 100 जोडप्यांच्या वैवाहिक जीवनाचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा आगळावेगळा शोध लावला आहे. अभ्यासाद्वारे महिलांचा शारीरिक बांधा आणि त्यांच्या पार्टनरच्या सुखाच्या-आनंदीच्या पातळीसंदर्भात काही मनोरंजक गोष्टी संशोधकांनी मांडल्या आहेत. ज्या पुरुषांनी लठ्ठ महिलांसोबत लग्न केले आहे, ते पुरुष आयुष्यात दहा पट आनंदी असल्याचा निष्कर्ष संशोधनाद्वारे समोर आला आहे.
या उलट हडकुळ्या, बारीक महिलांसोबत लग्न केलेल्या पुरुषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांसोबत लग्न केलेल्या पुरुषांचे हसण्याचे प्रमाण देखील अधिक असल्याचं निदर्शनास आले. शिवाय, लठ्ठ महिला या रिलेशनशिपमधील समस्या अधिक चांगल्या पद्धतीनं हाताळतात, असेही संशोधकांना आढळून आले आहे. तर हडकुळ्या आणि बारीक महिला पटकन कोणातही न मिसळणाऱ्या, अंतर्मुख स्वभावाच्या, तसंच खूप कमी प्रमाणात व्यक्त असतात. त्यांचा हा स्वभाव नात्यातील आनंदावर परिणामकारक ठरू शकतो, असेही संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे.
एकूणच लठ्ठ महिला पार्टनरला अधिक आनंदात ठेवतात, असा निष्कर्ष नॅशनल ऑटोनोमस युनिर्व्हसिटी ऑफ मेक्सिकोच्या संशोधकांनी मांडला आहे. पण तरीही तुम्ही बारीक आहात किंवा लठ्ठ, याचा फारसा वैवाहिक आयुष्यावर काहीही फरक पडत नाही. कारण हल्लीच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या आयुष्यात तसंही किरकोळ कारणांमुळे घटस्फोटांचं प्रमाण बरंच वाढले आहे. ऑफिस, काम, करिअर यामुळे जोडपी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीयेत.
यामुळे वाढणारे गैरसमज, वादावादी, भांडणं, संशय यांसारख्या कारणांचा आधार घेऊन जोडपी विभक्त होत आहेत. तर अशा शुल्लक कारणांमुळे आपल्या नात्यामध्ये फूट पडू नये, यासाठी तुम्ही किती मेहनत घेत आहात आणि आपल्या पार्टनरला प्राधान्य देऊन वेळ देता आहात, हे बाब महत्त्वाची आहे. तुम्ही मानसिक-शारीरिकरित्या फिट-निरोगी आहात की नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वतः मनानं आणि शरीरानं शांत-आनंदित असाल तेव्हाच तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सुखाचीही काळजी योग्यरितीनं घेऊ शकता. पटतंय ना, सो Size Doesn't Matters.