'अशा' व्यक्तीला नकार देण्यातच तुमचं भलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:58 PM2019-04-17T16:58:52+5:302019-04-17T17:09:00+5:30
मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे.
(Image Credit : Crosswalk.com)
मुलगा असो वा मुलगी पार्टनर निवडताना काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं जातं. त्या व्यक्तीचं वय किती आहे, तो काय करतो आणि त्याचं बालपण कसं गेलं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, या गोष्टी बघितल्या जातात. पण हेही तितकंच खरं आहे की, वेळेनुसार प्राथमिकता बदलतात. ज्या गोष्टी तारुण्यात आवडतात त्या काही काळीने अचानक कंटाळवाण्या वाटू लागतात. आवड ही वेळेनुसार बदलत जाते. पण जर तुम्ही एखाद्या मुलाला जर डेट करत असाल आणि त्याला स्वभाव खालीलप्रमाणे विचित्र असेल तर त्याला सोडलेलेचं बरे.
१) ज्या मुलाला तुम्ही डेट करताय त्याला सतत राग येतो किंवा तो सतत चिडचिड करतो का? जी व्यक्ती दुसऱ्यांवर केवळ ओरडते किंवा रागावते ती व्यक्ती एक चांगला पार्टनर होऊ शकत नाही.
(Image Credit : Dating Tips)
२) काय तो छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्याचं शारीरिक बळ दाखवतो? असं असेल तर वेळीच या माणसाला दूर करण्यात तुमची भलाई आहे.
३) जर तो तुमच्या बोलण्याकडे लक्ष देत नसेल, तुमच्या असण्या-नसण्याने त्याला काही फरक पडत नसेल, तो नेहमी त्याचंच खरं मानत असेल तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाहीत.
(Image Credit : RePose Therapy)
४) जर ही व्यक्ती रोज नशा करत असेल, नशा करुन घरात धिंगाणा घालत असेल तर बंर होईल की, वेळीच अशा व्यक्तीपासून व्हा.
(Image Credit : The Cheat Sheet)
५) तो जर तुमच्याशी घाणेरड्या भाषेत, अपमानजनक शब्दांचा वापर करुन बोलत असेल, तुमचा चारचौघात किंवा एकट्यातही सन्मान करत नसेल तर अशा नात्याला काय अर्थ?
(Image Credit : Building Blocks Family Counseling)
६) तो जर स्वार्थी किंवा अहंकारी असेल तर या नात्यात तुम्हाला कधीही आनंद मिळणार नाही. अशात वेळीच वेगळे झालेले बरे.