कोरोना लॉकडाऊनमुळे कपल्समध्ये "दुरावा";  2020 मध्ये झाले सर्वाधिक ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 11:25 AM2021-02-05T11:25:13+5:302021-02-05T11:32:06+5:30

Relationship : गेल्या कित्येक महिन्यांपासून कपल्स हे घरातच अडकून राहीले आहेत. अनेकांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.

miscellaneous lockdown break ups new survey says 2020 was year of most breakups | कोरोना लॉकडाऊनमुळे कपल्समध्ये "दुरावा";  2020 मध्ये झाले सर्वाधिक ब्रेकअप

कोरोना लॉकडाऊनमुळे कपल्समध्ये "दुरावा";  2020 मध्ये झाले सर्वाधिक ब्रेकअप

Next

नवी दिल्ली - फेब्रुवारी महिना सुरू झाला की अनेक जण व्हॅलेंटाईन डे ची वाट पाहतात. या निमित्ताने अनेक जण आपलं प्रेम व्यक्त करत आनंद साजरा करतात. मात्र यंदाचा व्हॅलेंटाईन डे हा सर्वांसाठीच थोडा वेगळा असणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कपल्स हे घरातच अडकून राहीले आहेत. अनेकांना ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये कपल्समध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यांना भेटता आलं नाही, कोरोनाचा फटका हा कपल्सना मोठ्या प्रमाणात बसला असून 2020 या वर्षात सर्वाधिक ब्रेकअप झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 

वुमेन फर्स्ट सोशल नेटवर्किंग अ‍ॅप बंबलने देशभरातील कपल्सच्या सहभागातून नुकताच एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच 28 टक्के ब्रेकअप झाले आहेत. कोरोनामुळे प्राथमिकतेत झालेला बदल हे यामागील प्रमुख कारण आहे. बंबलच्या सर्व्हेनुसार, जोडीदाराला भेटू न शकणं हे ब्रेकअपचे प्रमुख कारण ठरलं. 46.45 टक्के लोकांना असं वाटतं की लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकले नाहीत त्यामुळेच  ब्रेकअपमध्ये झालं. 

3 पैकी 1 म्हणजेच 29 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, अस्तित्वात असलेल्या अडचणी, वाढल्या आणि तेच ब्रेकअपसाठी कारणीभूत ठरलं.  2021 हे नववर्ष अविवाहितांसाठी नवी आशा घेऊन आलं आहे. कोरोनाच्या अनुषंगाने पुरेशी काळजी घेत लोकांनी दैनंदिन व्यवहार सुरू केले आहेत. जे अविवाहित आहेत ते आता जोडीदाराच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी त्यादृष्टीने शोध सुरू केला आहे. 2020 मधील अनुभवी लोकांनी महिलांना आपले प्रेम घाईत मिळवण्याऐवजी आपल्या योग्य जोडीदाराच्या गुणांवर लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडलं आहे.

नव्या ट्रेंडविषयी बोलताना बंबल इंडिया पीआरच्या संचालक समर्पिता समद्दर यांनी जे नातं योग्य रितीनं निभावलं जात नव्हतं, ज्या नात्यातून आनंद मिळत नव्हता, असे नातेसंबंध थांबवण्याची वेळ आणि धाडस महिलांना 2020 मधील घटनांनी दिलं. 2021 हे वर्ष अविवाहित महिलांसाठी नवी आशा घेऊन आलं आहे. आता त्या नव्या सामान्य स्थितीत अस्थिरतेला मागे टाकून आनंदी आणि आरोग्यदायी वर्षात पाऊल ठेवत आहेत. आमच्या अंदाजानुसार 2021च्या सुरुवातीला डेटिंगमध्ये वाढ होईल. कारण 69 टक्के लोकांचं म्हणणं आहे की ते 2021मधील व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटिंग अ‍ॅप्सचा गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वापर करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: miscellaneous lockdown break ups new survey says 2020 was year of most breakups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.