रिलेशनशिपमध्ये पैसे आणि लूक्सपेक्षा या गोष्टीही असतात महत्त्वाच्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:06 PM2018-10-02T12:06:36+5:302018-10-02T12:08:13+5:30
अनेकजण हे आपल्या रिलेशनशिपबाबत सिरीअस नसतात. त्यांचं रिलेशनशिप केवळ पैसे आणि लूक्स यावरच अवलंबून असतं. अशाप्रकारची नाती फार काळ टिकत नाहीत.
अनेकजण हे आपल्या रिलेशनशिपबाबत सिरीअस नसतात. त्यांचं रिलेशनशिप केवळ पैसे आणि लूक्स यावरच अवलंबून असतं. अशाप्रकारची नाती फार काळ टिकत नाहीत. एका रिलेशनशिपमध्ये एकमेकांना समजणे, विश्वास, इमानदारी या सर्व गोष्टी गरजेच्या असतात. कोणतही नातं हे विश्वास आणि भावनांशी जुळलेलं असतं.
नातं मजबूत करण्यासाठी पैशां व्यतिरिक्तही बरंचकाही महत्त्वाचं असतं. या गोष्टींची माहिती आणि जाणिव कपल्सना असणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि या महत्त्वाच्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमचं नातं तुटू शकतं. त्यामुळे चला जाणून घेऊ रिलेशनशिपमध्ये पैसे आणि लूक्स व्यक्तिरिक्त आणखी काय अधिक महत्त्वाचं असतं.
१) एकमेकांना समजून घेणे
२) विश्वास
३) सन्मान
४) भांडण सोडवण्याची पद्धत
५) मोठं मन
- एकमेकांना समजून घेणे - काही कपल्सना सोबत फिरायला जाणे, सोबत वेळ घालवणे पसंत असतं. जास्तीत जास्त वेळ सोबत घालवल्याने तुम्ही एकमेकांना जाणून घेऊ शकता. याने नातंही मजबूत होतं. याच गोष्टी नात्यामध्ये असणं अधिक गरजेचं आहे.
- विश्वास - कोणतही नातं हे विश्वासावर टिकतं. जर तुमचा एकमेकांवर विश्वास नसेल तर तुमचं नातं फार जास्त काळ टिकणार नाही. नातं आणखी मजबूत करण्यासाठी विश्वास अधिक गरजेचा असतो.
- सन्मान - रिलेशनशिपमध्ये असण्याचा अशा अर्थ नाही की, तुम्ही एकमेकांचा सन्मान विसराल. रिलेशनशिपमध्ये पैसे आणि लूक्ससोबतच एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांच्या विचारांचा सन्मान करणे गरजेच असतं.
- भांडण सोडवण्याची पद्धत - कोणत्याही नात्यात भांडणं होत असतात. दोन वेगवेगळ्या विचारांची लोकं एकत्र आल्यावर अर्थातच काही छोटी मोठी भांडणं होतातच. पण याचा अर्थ हा नाही की, दोघांनीही राग धरुन बसावं. भांडणं सोडवणं, संपवणं हे कोणत्याही नात्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याची खास पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे.
- मोठं मन - चुका या सर्वांकडूनच होत असतात. पण एखाद्याची काही चुकी झाली असेल तर ती माफ करण्यासाठीही मोठं मन लागतं. या चुकांमुळे गैरसमज करुन घेतल्यास नातं अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे चूक झाल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीने माफी मागितली तर त्याला माफ करणे मोठी गोष्ट आहे.