Mother's Day : 'या' दिवशी आईसाठीच नाही तर सासुबाईंसाठीही घ्या स्पेशल गिफ्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 05:33 PM2019-05-10T17:33:57+5:302019-05-10T17:34:40+5:30
अनेकदा असं सांगितलं जातं की, लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जातं. खासकरून एका मुलीचं. पण जर या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकनातून पाहिलं तर तुमच्या लक्षात येइल की, तुम्ही काहीही गमावलेलं नाही, तर तुम्ही काही गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत.
अनेकदा असं सांगितलं जातं की, लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जातं. खासकरून एका मुलीचं. पण जर या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकनातून पाहिलं तर तुमच्या लक्षात येइल की, तुम्ही काहीही गमावलेलं नाही, तर तुम्ही काही गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला तुमच्या आईसारखीच सासू मिळते. अर्थात तुमच्या दोघींमधील नातं कसं आहे, हे तुम्ही एकमेकींशी कशा वागता यावरही अवलंबून असतं. पण जर तुम्ही काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर सर्व गोष्टी ठिक होण्यासोबतच तुमच्या नात्यामधील प्रेम वाढण्यासही मदत होते. आता याची सुरुवात मदर्स डेपासून करा. या खास दिवसासाठी तुम्ही आईसाठी खास गिफ्ट घेण्याचा विचार करतच असाल, तर तुम्ही तुमच्या सासुबाईंसाठीही गिफ्ट खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्यामधील सासू-सुनेचं नातं नाही तर आई-मुलीचं नातं तयार होईल.
'मदर्स डे'च्या निमित्ताने सासुबाईंसाठी खास प्लॅन करा
'मदर्स डे'च्या दिवशी आईसोबतच सासूबाईंनाही स्पेशल फिल करायचं आहे आणि तुम्हाला काही सुचत नसेल, तर आम्ही तुम्हाला मदत करतो. आज आम्ही काही ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही त्यांना खूश करू शकता. यामुळे तुमच्या नात्यामधील प्रेम वाढण्यासोबतच नातं आणखी घट्ट होईल. जाणून घेऊया काही खास गिफ्ट आइडिया...
सुंदर साडी
जर तुमच्या सासुबाईंना साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही 'मदर्स डे'साठी गिफ्ट देऊ शकता. त्यांच्या आवडीचा रंग, फॅब्रिक आणि त्यांच वय लक्षात घेऊन तुम्ही साडी निवडू शकता.
हेव्ही बनारसी दुपट्टा
जर तुमच्या सासुबाईंना साड्या नेसायला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्यांना एखादा सुट गिफ्ट करू शकता. जर त्यांच्याकडे सुट्सचं कलेक्शन खूप असेल तर त्याऐवजी तुम्ही हेव्ही बनारसी सिल्क दुपट्टा गिफ्ट करू शकता. तसंही सध्या सिम्पल सूट आणि हेव्ही दुपट्टा ट्रेन्डमध्ये आहे.
पर्स किंवा क्लच
जर तुमच्या सासुबाईंकडे कपड्यांच खूप सुंदर कलेक्शन आहे आणि तुम्हाला त्यांना गिफ्टमध्ये कपडे भेट द्यायचे नसतील तर तुम्ही पर्स किंवा क्लच ट्राय करू शकता. त्यांचा मूड आणि चॉइस लक्षात घेऊन क्लच किंवा पर्स सिलेक्ट करू शकता.
ईयररिंग्स
ज्वेलरी नेहमी गिफ्ट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरतो. परंतु हे परफेक्ट तेव्हाच बनतं जेव्हा तुम्ही योग्य ज्वेलरीचा ऑप्शन निवडू शकता. अशातच सासूबाईंना गिफ्ट करण्यासाठी ईयररिंग्स उत्तम ऑप्शन आहे.
ब्युटी अॅन्ड व्हेलनेस प्रोडक्ट्स
तुम्ही आयुर्वेदिक स्किन केयर किंवा हेल्थ केयर प्रोडक्ट्सही 'मदर्स डे'च्या दिवशी सासुबाईंना गिफ्ट देऊ शकता.