मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2016 05:05 PM2016-02-24T17:05:56+5:302016-02-24T10:05:56+5:30
जगात अब्जाधीशांची संख्या ९९ने वाढून २१८८ झाली आहे. हा एक नवा जागतिक विक्रम आहे.
Next
उ ्योगपती मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक धनाढ्य व्यक्ति ठरले आहेत. त्यांचे नेटवर्थ ३० टक्के वाढून २६ अब्ज डॉलरवर पोहाचल्याने जगातील श्रीमंतांच्या यादीत ते २१ व्या स्थानी पोहोचले आहेत. या यादीत बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आहेत.
चीनच्या हुरन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ‘हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०१६’ नुसार, भारतातील अब्जाधीशांची संख्या १११ झाली आहे. ही संख्या गतवर्षीपेक्षा १४ ने अधिक आहे. बिल गेट्सनंतर वॉरेन बफे दुसºया क्रमांकावर आहेत. जगातील पाच अब्जाधीशांच्या या यादीत जेफ बेजॉस व कार्लोस स्लिम हेलू यांचाही समावेश आहे. जगात अब्जाधीशांची संख्या ९९ने वाढून २१८८ झाली आहे. हा एक नवा जागतिक विक्रम आहे.