'मर्द को ज्यादा दर्द होता है'... महिलांच्या तुलनेत पुरुषच असतात अधिक हळवे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 11:59 AM2019-01-15T11:59:28+5:302019-01-15T12:14:27+5:30

जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता', बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' सिनेमातील हा फेमस डायलॉग आपण बहुतांश वेळा ऐकला असेलच. पण सत्य परिस्थितीत पाहायला गेले तर पुरुषांची अवस्था या डायलॉगच्या अगदी विरुद्धच असल्याचे एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

new study claims that men feel more pain than women | 'मर्द को ज्यादा दर्द होता है'... महिलांच्या तुलनेत पुरुषच असतात अधिक हळवे

'मर्द को ज्यादा दर्द होता है'... महिलांच्या तुलनेत पुरुषच असतात अधिक हळवे

Next
ठळक मुद्देभूतकाळातील आठवणींना पुरुष देतात वारंवार उजाळामहिलांच्या तुलनेत पुरूष अधिक असतात हळवे

'जो मर्द होता है उसे दर्द नहीं होता', बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' सिनेमातील हा फेमस डायलॉग आपण बहुतांश वेळा ऐकला असेलच. पण सत्य परिस्थितीत पाहायला गेले तर पुरुषांची अवस्था या डायलॉगच्या अगदी विरुद्धच असल्याचे एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष भूतकाळातील कटू घटना आठवून हळवे होतात, असे मांडण्यात आले आहे.  

महिलांना काही कारणांमुळे किंवा अनुभवांमुळे त्रास होतोच, पण काही काळानंतर महिला त्या कटू आठवणी डोक्यात स्टोअर करुन ठेवण्यापेक्षा विसरणं पसंत करतात. पण पुरुषांच्या बाबतीत ही परिस्थिती अगदी उलट असते, अशी माहिती रिसर्चद्वारे समोर आली आहे. पुरुष त्यांना आलेल्या वेदनादायी अनुभव दीर्घकाळापर्यंत आपल्या आठवणीत ठेवतात.    

1. वेदनादायी अनुभवांना वेगवेगळ्या पद्धतींनी लक्षात ठेवणे : 
कॅनाडातील युनिर्व्हसिटी ऑफ टोरेंटो मिस्सीसॉगा UTM मधील संशोधनकर्त्यांनी यावर महत्त्वपूर्ण अभ्यास केला आहे. महिला आणि पुरुष त्यांना आलेले वेदनादायी अनुभव स्वभावानुसार वेगवेगळ्या पद्धतींनी लक्षात ठेवतात, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे पुरुष त्यांचे कटू-वाईट अनुभव कधीच विसरत नाहीत. त्या आठवणी त्यांच्यासोबत आयुष्यभर टिकून राहतात. दुसरीकडे, महिला जीवनातील त्रासदायक गोष्टी पूर्णतः विसरू शकत नसल्या तरी त्या भूतकाळातल्या गोष्टी वर्तमान किंवा भविष्यकाळात येऊ देतात नाहीत. एकूण निरर्थक गोष्टींवर विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवत नाहीत.   


2. वेदनादायी आठवणींमुळे पुरुष येतात तणावात
भूतकाळात घडलेल्या एखाद्या कटू घटना वारंवार आठवून पुरुष तणावात येतात. वाईट अनुभवांच्या आठवणीने ते हायपरेसेन्सेटिव्ह होतात. महिलांनाही एखाद्या त्रासदायक अनुभवांची कधीतरी, कोणत्या-ना-कोणत्या गोष्टींमुळे आठवण होते, पण त्या आठवणींमुळे महिला तणावग्रस्त होत नाहीत. या समस्यांचा महिला सकारात्मक पद्धतीनं सामना करतात. यावर अभ्यास करताना संशोधकांनी महिला-पुरुषांप्रमाणेच उंदरांवरही प्रयोग केला. या प्रयोगामध्ये उंदरांना एका विशेष खोलीत ठेवण्यात आले होते. येथे त्यांना उष्णतेच्या (Heat)मदतीनं निरनिराळ्या पद्धतीनं त्रास देण्यात आला.

दरम्यान, या अभ्यासानुसार, पुरुषांना दुसऱ्या दिवशी महिलांच्या तुलनेत अधिक त्रास जाणवत होता. कारण त्यांनी आदल्या दिवशी देण्यात आलेला त्रास विसरुन न जाता त्याची नोंद डोक्यात पक्की करुन ठेवली होती. 

3. क्रॉनिक पेन
शारीरिक वेदना दीर्घकाळापर्यंत टिकून असणे, यास क्रॉनिक पेन म्हणतात. काही जण वारंवार कटू घटना आठवून दुःखी होतात, नैराश्य-तणावग्रस्त, विचारमग्न होतात. क्षणिक दुःख आठवून आपण आपल्या आयुष्यातील मौल्यवान क्षण वाया घालवत आहोत, इतकं साधे गणित त्यांना समजत नाही. त्याच-त्याच घटना आठवून ही माणसं जगणं विसरतात. त्यामुळे शक्य असल्यास अशा लोकांना आपण त्यांच्या त्रासदायक आठवणींतून बाहेर पडण्यास मदत करावी.   


 

 

Web Title: new study claims that men feel more pain than women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.