OMG : ‘या’ कारणाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 12:35 PM2017-09-23T12:35:00+5:302017-09-23T18:34:31+5:30

आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लताजींनी लग्न का नाही केले? असे कोणते कारण आहे ज्यामुळे त्यांनी संसार थाटला नाही? जाणून घ्या !

OMG: Lata Mangeshkar did not do this song due to 'marriage'! | OMG : ‘या’ कारणाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न !

OMG : ‘या’ कारणाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न !

Next
शाची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाचे करोडो लोक चाहते आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. विशेषत: त्यांच्या बाबतीत चर्चा करताना प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येत असेल की, आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लताजींनी लग्न का नाही केले? असे कोणते कारण आहे ज्यामुळे त्यांनी संसार थाटला नाही?  

लताजींना एकदा एका मुलाखतीत याविषयी प्रश्नही विचारण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, परिवार आणि लहान भाऊ-बहिणींच्या जबाबदारीमुळे त्यांना कधी याविषयी विचार करायला वेळच मिळाला नाही. ही गोष्ट तर सर्वच जाणतात, मात्र यामागे अजून वेगळे कारणही होते ज्याविषयी बऱ्याचजणांना कल्पनाही नाही.   

* पहिले प्रेम  
लता मंगेशकर यांना आपल्या भावाच्या मित्रासोबत प्रेम झाले होते ज्यांचे नाव राज सिंह होते आणि ते डूंगरपुर राजघराण्याचे महाराजा होते. लताजींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. त्याठिकाणी ते लताजींच्या घरीदेखील यायचे आणि त्यांच्या भावासोबत क्रि केटदेखील खेळायचे. लताजींनादेखील क्रिकेट खूप आवडायचे. यादरम्यानच दोघे एकमेकांना आवडू लागले. त्यावेळी लताजी देखील हिंदी चित्रपटातून प्रसिद्धीस आल्या होत्या. याविषयी मात्र लताजींनी कधीही चर्चा केली नाही मात्र त्यावेळी मीडियाद्वारे या दोघांच्या नावाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या.   

* या कारणाने नाही केले लग्न 
दोघेही एकमेकांना पसंत करु लागले होते आणि लग्नदेखील करु इच्छित होते मात्र राज सिंह यांनी परिवाराला वचन दिले होते की, ते साधारण कुटुंबाच्या घरच्या मुलीशी लग्न करणार नाहीत. या कारणाने दोघांचे लग्न नाही झाले. त्यानंतर मात्र लताजींनी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहण्याचे ठरविले आणि विशेष म्हणजे राज सिंह यांनीही लग्न केले नाही.    

लता मंगेशकर भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

source : nari.punjabkesari.com

Web Title: OMG: Lata Mangeshkar did not do this song due to 'marriage'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.