OMG : ​ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 01:08 PM2017-09-19T13:08:01+5:302017-09-19T18:38:01+5:30

एका संशोधनातून ब्रेक्रअप होण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, असे आढळून आले आहे. ब्रेक्रअप झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...

OMG: 'These' are the effects of the breakup! | OMG : ​ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !

OMG : ​ब्रेकअप होण्याचे ‘हे’ आहेत साईड इफेक्ट !

Next
लिवूड, हॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांची थीम ब्रेकअप या आशयावरच अवलंबून आहे, विशेषत: अशा चित्रपटांना प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसादही दिला. कारण ब्रेक्रअपचा थेट संबंध आपल्या भावनांशी असतो आणि याचा परिणाम सर्व भावनात्मक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. ब्रेकअपचा काळ तसा खूप कठीण असतो. एका संशोधनातून ब्रेक्रअप होण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, असे आढळून आले आहे. 
ब्रेक्रअप झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...

* झोपेवर परिणाम होतो 
आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो, त्याच्याशिवाय आपण काही काळही वेगळे राहू शकत नाही. तो जर प्रत्येक्षात जवळ नसेलही तरी कुठल्यातरी माध्यमाने तो आपल्या जवळच असतो. मात्र जेव्हा आपल्या जवळच्या माणसाशी आपला संपर्क तुटतो तेव्हा त्याची अधिक गरज भासू लागते अर्थातच काळजी वाढते. वैज्ञानिकांप्रमाणे ब्रेकअपने मेंदूचा तो भाग सक्रिय होऊन जातो जो साधारणत: कोकिनच्या सवयीमुळे होतो.

* छाती दुखणे
ब्रेकअपनंतर शरीरात काही बदल होणे सुरु होते. त्यात वेदना संदेश पोहणाऱ्या नसा सक्रिय होतात. त्यामुळे डोकेदुखीसह छातीत अधिक दुखायला सुरुवात होते. 

* त्वचेचे विकार 
ब्रेकअप झाल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे आपण तणावात येतो आणि तणावामुळे व्यक्ती स्वत:वर लक्ष देत नाही परिणामस्वरूप स्ट्रेस हार्मोन्समुळे स्कीन प्रॉब्लम सुरू होते. एवढेच नाही तर केसही गळू लागतात.

* स्नायू वेदना
तणावाच्या परिस्थितीत आपण आपला आत्मविश्वास गमवून बसतो त्यामुळे मनोधैर्य खचल्यासारखे वाटते. यामुळे स्नायू वेदनांमुळे शरीरातील अनेक भागांमध्ये वेदना जाणवतात.

* वजन वाढणे
ब्रेकअप झाल्यानंतर सतत त्याच विचारात आपण गुंततो त्यामुळे भूक नाहिसी होते. शिवाय ब्रेकअप झाल्यावर तणावामुळे वजन वाढतं हेही तेवढंच खरं आहे. तणावामुळे झोप न येणे, व्यायाम न करणे आणि पोटाचं आरोग्य बिघडल्यामुळे वजन वाढतं. 

* मानसिक संतुलन बिघडते
आत्मविश्वास खचल्याने आणि तणाव निर्माण झाल्याने मानसिक संतुलन बिघडते. याचाच परिणाम आपल्या शरीरावरही दिसून येतो. वेळीच सावरले नाही तर मानसिक रुग्ण होण्याची भीती असते. 

Web Title: OMG: 'These' are the effects of the breakup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.