तुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 05:19 PM2019-01-23T17:19:08+5:302019-01-23T17:21:38+5:30
मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात.
मुलांचं संगोपन करणं म्हणजे पालकांसाठी अत्यंत अवघड काम. त्यांची काळजी घेण्यात आई-वडिलांना आपलं मुल कधी मोठं झालं हे समजतंच नाही. मुलांचे हट्ट पुरवण्यात बीझी असलेले आई-बाबा अनेकदा त्यांच्या वागण्याकडे आणि सवयींकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा अतीलाडामुळे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुलांना कमी वयातच वाईट सवयी लागतात. पण अशातच योग्य वेळी मुलांना त्या सवयी सोडण्यासाठी भाग नाही पाडलं तर मात्र फार अवघड जातं. याचे अनेक गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. पालक विचार करतात की, वेळेनुसार या वाईट सवयी दूर होतील. परंतु कमी वयामध्ये जडलेल्या वाईट सवयींना दूर करणं अशक्य असतं. कारण वेळेसोबत सवयी स्वभावाचाच एक भाग बनून जातात.
तुमचं मुलंही खोटं बोलतयं?
मुलांच्या सर्व घाणेरड्या सवयींमध्ये 'खोटं बोलणं' एक अशी सवय आहे जी कॉमन आहे. परंतु कॉमन आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण एकदा मुलानं खोटं बोलणं सुरू केलं तर ही सवय आयुष्यभरासाठीही तशीच राहू शकते.
मुलं का बोलतात खोटं?
जर तुम्हाला तुमची मुंल छोट्या छोट्या गोष्टींवर खोटं बोलत असल्याचे जाणवले तर सर्वात आधी त्याच्या या वाईट सवयी मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या शालेतील टिचरला घाबरणारी मुलं अनेकदा शाळेमध्ये खोटं बोलतात. आई-वडिलांपासून एखादी गोष्ट लपवण्यची गरज असेल तर मुलं खोटं बोलतात. अनेकदा तर एखादी चूक झाल्यानंतर ती लपवण्यासाठीही मुलं खोटं बोलतात.
मुलांची खोटं बोलण्याची सवय सोडण्यासाठी करा हे उपाय :
1. मुलांशी वागण्याची पद्धत बदला
मुलांच्या एखाद्या सवयीमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वात आधी पालकांना मुलांशी बोलण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही त्यांना विचारलं की, अभ्यास केलास का? त्यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी मुलं खोटं बोलू शकतात. याऐवजी तुम्ही त्यांना तू अभ्यास कधी करणार? असं विचारलं तर मुल तुम्हाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
2. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा
कुठे आणि कोणासोबत काय बोलायचे आहे? एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं आणि खोटं बोलण्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. मुलांना हे अवश्य सांगा. 5 वर्षांच्या मुलांना खोटं बोलण्याचा अर्थही समजत नाही. त्यामुळे त्यांना नीट समजावून सांगा.
3. रागावू नका
मुलांवर सतत रागावू नका, त्यांना समजून घ्या. तुम्ही मुलांवर सतत रागावत असाल तर त्यापासून वाचण्यासाठी मुलं सर्रास खोटं बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी प्रेमाने वागा.
4. तुमचा फायदा पाहू नका
काही पालक आपल्या सवडीनुसार मुलांशी वागतात. जेव्हा मुल खोटं बोलतं तेव्हा त्याची ती सवय सुधारण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असं केल्याने मुलांची सवय आणखी बिघडते.
5. प्रेमाने सांभाळ करा
जर तुमचं मुलं खोटं बोलत असाल्याचे तुमच्या लक्षात येईल त्यावेळी त्यांना ओरडण्या किंवा मारण्याऐवजी बोलून समजावून सांगा. जर त्यावेळी तुम्ही रागावलात तर ते आणखी घाबरती आणि ही सवय आणखी वाढेल.