'या' 5 सवयींमुळे बिघडू शकतात लहान मुलं; वेळीच काढा समजूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 05:11 PM2019-05-01T17:11:01+5:302019-05-01T17:26:13+5:30
मुलांचा सांभाळ करताना पालक सर्व उपाय करत असतात. अनेकदा मुलांना कसं सांभाळावं?, त्यांना कसं आणि काय शिकवावं? याबाबत अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात.
मुलांचा सांभाळ करताना पालक सर्व उपाय करत असतात. अनेकदा मुलांना कसं सांभाळावं?, त्यांना कसं आणि काय शिकवावं? याबाबत अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात. पण खरं तर मुलांना सांभाळणं एवढं सोपं काम नाही. कारण मुलं कधी आणि काय हट्ट करतील हे तर साक्षात ब्रम्हदेवालाही ठाऊक नसतं. पण तुमच्या संस्कारांचा त्यांच्यावर कितपत उपयोग होतो आणि त्यामुळे ते कोणत्याही चुकीच्या रस्त्यावर तर जात नाहीत ना? याबाबत विचार करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुमच्या मुलांमध्ये दिसून आल्या तर तुमची मुलं चुकीच्या ट्रॅकवर आहेत. हे समजण्यास मदत होईल.
1. दुसऱ्या मुलांसोबत सतत मारामारी करणं
मुलांच्या बिघडण्याची सुरुवतच येथून होते असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. जर त्यांच्या शाळेतून सतत याबाबत तक्रारी येऊ लागल्या तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे. त्यांची ही सवय वेळीच सुधारणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांची ही सवय वाढत जाते आणि त्यांचाही सतत भांडणाऱ्या मुलांमध्ये समावेश होईल.
(Image Credit : Washington Post)
2. आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग
पालकांनी मुलांच्या वाडत्या वयासोबतच त्यांच्या बोलण्याच्या भाषेवरही लक्ष देणं गरजेचं आहे. ते कोणाशी आणि काय बोलतात? बोलताना काही आक्षेपार्ह विधानं तर करत नाहीत ना? या गोष्टी एक पालक म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मुलं चुकीच्या शब्दांचा प्रयोग करत असल्याचे आढळले तर, त्यावेळी त्यांना रागावण्याऐवजी त्यांची समजूत काढा. त्यांना त्यांची चूक समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
3. हट्टीपणा
तसं पाहायला गेलं तर सर्वच मुलं हट्टी असतात. परंतु वाढत्या वयानुसार जर मुलांचा हट्ट वाढू लागला तर त्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. कारण याकडे दुर्लक्ष केलं तर हट्टीपणा त्यांच्या स्वभावाचाच हिस्सा बनण्याची शक्यता असते. मोठं झाल्यावरही ते प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करतात आणि त्यानंतर स्वतःचंच नुकसान करून घेतात.
4. पैसे चोरी करत असतील तर...
अनेकदा जेव्हा पालक मुलांचा हट्ट पूर्ण करत नाही. मुलांना काहीच देत नाहीत. अशावेळी मुलं आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी चोरी करणं सुरू करतात. दुसऱ्या मुलांकडे दिसलेले खेळणी किंवा वस्तू त्यांना आवडतात आणि त्या आपल्याकडेही असाव्यात असं त्यांना वाटत असतं. परंतु पालक त्यांना काहीच देत नाहीत. त्यामुळे ते चोरीचा मार्ग स्विकारतात. ही गोष्ट जेव्हा तुमच्या लक्षात येते. तेव्हा त्यांना रागावण्याऐवजी त्यांची समजूत काढा.
5. अहंकारी किंवा गर्विष्ट स्वभाव
प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलाना चांगली खेळणी देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सर्व चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर तुमच्या मुलांना त्या सर्व गोष्टींचा गर्व वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांची ही सवय त्यांना लवकरात लवकर बदण्यास सांगा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.