मुलांना इंटेलिजेंट बनवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:53 PM2019-04-08T19:53:22+5:302019-04-08T19:53:40+5:30

सर्वच आई-वडिल आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंतीत असतात. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

Parenting tips for smart and intelligent kids | मुलांना इंटेलिजेंट बनवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात घ्या

मुलांना इंटेलिजेंट बनवण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात घ्या

googlenewsNext

सर्वच आई-वडिल आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंतीत असतात. आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांना योग्य दिशा दाखवणं आणि समजूतदार बनवणं यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. आपलं मूल अभ्यासात हुशार असावं यासाठी ते त्याच्या अभ्यासावर लक्ष देतात. मुलांना मानसिकरित्या सक्षम आणि इंटलिजेंट करण्यासाठी त्यांना नवनवीन गोष्टी शिकवत असतात. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही आपल्या मुलांना इंटेलिजेंट बनवू शकता. जाणून घेऊया काही खास टिप्सबाबत...

1. आपल्या मुलांशी गप्पा मारा

मुलांना इंटेलिजेंट करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स अत्यंत महत्त्वाच्या असतात. मुलांशी बोलल्यामुळे तुमच्या आणि मुलांमध्ये नातं मजबूत होतं. त्याचबरोबर मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच हेल्दी आणि वर्बल एक्टिविटीमध्ये भाग घेण्याची सवय लावा. त्यांना इंग्लिश, हिंदी किंवा आपल्या भाषेत बोलण्याची सवय लावा. जेणेकरून त्यांना पुढे जाऊन त्यांच्या करियरमध्ये अडथळा वाटणार नाही. 

2. घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवा

मुलांना घरामध्ये हेल्दी वातावरण मिळेल याची काळजी घ्या. जेणेकरून मुलांचे विचार सकारात्मक होण्यास मदत होइल. मुलांना आधीपासूनच स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी एखाद्या विषयावर चर्चा करा. त्यांच्याशी खेळा. त्यांना कोणत्याही समस्या असतील तर त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. 

3. मुलांच्या वयानुसार त्यांची खेळणी निवडा

मुलांसाठी खेळणी निवडताना त्यांचं वय लक्षात घ्या. कारण खेळण्यांचा परिणाम मुलांच्या मानसिक विकासावर होतो. खेळणी मुलांना खूशही करतात आणि त्यांना निराशही करू शकतात. नेहमी अशा खेळण्यांची निवड करा, ज्यामुळे मुलांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी मदत होते. 

4. मुलांना घरामध्ये शिकवा

मुलं शाळेत जाऊन शिकतील याची वाट पाहू नका. त्यांना लहानपणापासूनच घरामध्ये काही गोष्टी शिकवण्यास सुरुवात करा. मुलांना खेळासोबतच इंग्लिश अल्फाबेट्स, काउंटिंग शिकवा. तुम्ही खेळण्यांच्या माध्यमातूनही मुलांना काही गोष्टी शिकवू शकता. यामुळ सुरुवातीपासूनच मुलांची समज वाढते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून सर्वांपुढे पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Parenting tips for smart and intelligent kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.