मुलांना एग्जाम स्ट्रेसपासून दूर ठेवण्यासाठी 'या' टिप्सचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 05:22 PM2019-02-25T17:22:38+5:302019-02-25T17:23:25+5:30

मुलांच्या परिक्षा म्हणजे, पालकांसाठी कसोटीचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिक्षाच्या दिवसांमध्ये मुलं आधीच तणावात असतात. अशातच पालकांनी मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं.

Parents follow these tips children will not have exam stress | मुलांना एग्जाम स्ट्रेसपासून दूर ठेवण्यासाठी 'या' टिप्सचा करा वापर

मुलांना एग्जाम स्ट्रेसपासून दूर ठेवण्यासाठी 'या' टिप्सचा करा वापर

Next

मुलांच्या परिक्षा म्हणजे, पालकांसाठी कसोटीचा काळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिक्षाच्या दिवसांमध्ये मुलं आधीच तणावात असतात. अशातच पालकांनी मुलांना समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. जर मुलांसोबत पालकही घाबरून गेले तर मात्र फार कठिण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे असं न करता मुलांना समजून घेऊन त्यांना टेन्शन फ्री ठेवणं ही पालकांची जबाबदारी असते. जाणून घेऊया पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स ज्यांच्या मदतीने मुलांना टेन्शन फ्री ठेवण्यासाठी मदत होइल. 

हा असतो ताण

साधारणतः परिक्षेच्या दिवसांमध्ये मुलांना दोन गोष्टींचे सर्वात जास्त टेन्शन येते. एक म्हणजे, त्यांना परिक्षेच्या वाटणाऱ्या भितीमुळे त्यांना परिक्षा द्यायची नसते आणि अभ्यासापसून पळ काढायचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांना परिक्षेचा रिझल्ट किंवा एखाद्या विशिष्ट्य विषयाची भिती वाटत असते. त्यामुळे ते आपला अभ्यास व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांना आधीपासूनच अभ्यासात मुलांना मदत करणं गरजेचं असतं. 

पियर प्रेशरमुळे वाढतो ताण 

टीनएजमध्ये पियर प्रेशर म्हणजेच, मित्र-मैत्रीणींमुळे आलेल्या ताणाचा मुलांवर फार परिणाम होत असतो. मुलं अनेकदा आपल्या स्वतंत्र विश्वात वावरत असतात. त्यांच्या या स्वतंत्र विश्वात मित्र-मैत्रीणींना अत्यंत महत्त्व असतं. परंतु येथे प्रश्न असतो की, ज्या मुलांशी तुमची मुलं मैत्री करतात, ती मुलं कशी आहेत? आणि मुलं त्यांच्या कोणत्या गोष्टीने प्रभावित होतात. मुलांमध्ये चालणाऱ्या विषयांवरून किंवा चिडवण्यावरूनही मुलांना तणावाचा सामना करावा लागतो. 

मार्क्सचं प्रेशर 

जेव्हा आई-वडिल फक्त मार्कांच्या गोष्टी करत असतात. तेव्हा मुलांना प्रचंड राग येतो. आई-वडिलांनी मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. परंतु त्यावेळी त्यांनी मुलांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची संमती द्यावी. जर तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती केली तर मात्र त्यांना जास्त तणावाचा सामना करावा लागतो. मुलांना त्यांनी किती मार्क्स मिळवावे हे सांगण्याऐवजी त्यांच्यामध्ये अभ्यासाबाबत आवड निर्माण करा. 

'ही' औषधं देऊ नका

काही मुलं परिक्षेदरम्यान तणावापासून बचाव करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या औषधांसोबतच कॉफी, चहा यांसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांचा आधार घेतात. अनेकदा पालकच ही औषधं घेण्याचा सल्ला देतात. अनेकदा तर मुलं डॉक्टरांकडे झोप येण्यासाठी औषधं मागतात. काही मुली मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खातात. असं करणं अत्यंत चुकीच आहे. याऐवजी तुम्ही तणावापासून बचाव करण्यासाठी म्यूझिक, खेल यांसारख्या तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा आधार घेऊ शकता. 

या गोष्टींची काळजी घ्या

परिक्षेच्या एक दिवस रात्र आधी मुलांनी पूर्ण झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं. एग्जाम पेपर समोर येताच सर्वात आधी संपूर्ण पेपर वाचणं गरजेचं असतं. त्यानंतर व्यवस्थित येणाऱ्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देणं गरजेचं असतं. 

Web Title: Parents follow these tips children will not have exam stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.