पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 02:08 PM2018-11-23T14:08:13+5:302018-11-23T14:08:53+5:30

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते.

Partner compare makes relation weak, Know Why? | पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

पार्टनरची इतरांशी तुलना केल्याने नातं येतं अडचणीत, पण का?

googlenewsNext

(Image Credit : bestlifeonline.com)

प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. ती व्यक्ती तोपर्यंत संतुष्ट राहते, जोपर्यंत त्याची दुसऱ्यांशी तुलना होत नाही. तुलना कधी कधी व्यक्तिमत्व विकासासाठी सहायक ठरते. पण याने कुणाच्या भावनाही दुखावल्या जाऊ शकतात. काही लोक प्रत्येक गोष्टी आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्यांशी करु लागतात. महिलांसोबत नेहमीच अशा गोष्टी होतात. जोपर्यंत महिला आपल्या पार्टनरसोबत आनंदी आहे. तोपर्यंत सगळंकाही ठिक असतं. पण जर जीवनात काही अडचणी आल्या तर त्या आपल्या पार्टनरची तुलना दुसऱ्या पुरुषांशी करु लागतात. याने नात्यात दरी निर्माण होते. त्यामुळे ही गोष्टी टाळायला हवी. 

अनेकांनी याबाबत लिहिले आहे की, एखादी व्यक्ती सुखी आणि संतुष्ट असते, पण जशी ती व्यक्ती स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करु लागते, तेव्हा त्यांना दु:खी असण्याचं आणि अंसतुष्ट असण्याचं कारण मिळतं. सोशल सायन्सचे तज्ज्ञ लिऑन फेस्टिंगर यांचा सामाजिक सिद्धांत हे दर्शवतो की, तुलनेची भावना व्यक्तीमध्ये नैसर्गिक रुपाने आहे. या माध्यमातून व्यक्ती हे जाणून घेऊ शकतो की, तो किती चांगला आणि वाईट आहे. 

सकारात्मक स्पर्धा चांगली

तुलनेचे काही चांगले फायदेही आहेत. उदाहरणार्थ एखादा धावपटूसाठी २०० मीटरची रेस ५० सेकंदात पूर्ण करणे मोठी उपलब्धी असू शकते. पण जेव्हा तो हे बघतो की, दुसरा धावपटू तितकच अंतर ४० सेकंदात पूर्ण करतोय. तेव्हा त्याला हे कळतं की, त्याला त्यांच्या धावण्यात आणखी सुधारणा करायला हवी. यात सकारात्मक स्पर्धेची भावना आहे. जी चांगले असते. 

तुलनेला सीमा असावी

तुलनेची एक सीमा निश्चित असायला हवी. त्यापलिकडे जाऊन तुलना केली गेली तर मनाचं ओझं आणि दडपण वाढतं. तसेच दुसऱ्यांकडे जे आहे ते माझ्याकडे नाही, अशी भावना मनात येते. जर कुणात आधीच आत्मविश्वास कमी असेल तर दुसऱ्यांशी तुलना त्याला आणखी डिचवते. पण हे अबाधित सत्य आहे की, एखादी व्यक्ती जर यशस्वी, धनवान किंवा बुद्धीवान असल तर दुसरा त्याच्यापेक्षा अधिक मजबूत, धनवान, यशस्वी, मोठा, सुंदर, आनंदी आणि शक्तीशाली असतोच.

कशी करावी तुलना?

असे म्हणतात सुंदरता ही बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. याचा अर्थ हा होतो की, जे दिसत आहे, त्याच्यापेक्षा जो बघत आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. वास्तव हे आहे की, बघणाऱ्याचे डोळे केवळ चेहरा, उंची किंवा वजन इथपर्यंतच जाऊ शकते, त्याला हे कळत नाही की, समोरची व्यक्ती किती रागीत किंवा किती चांगली आहे. कोणताही व्यक्ती १०० टक्के दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतोच. 

१) या खेळात विजय मिळत नाही हा विचार करा. कोणत्याही वळणावर विजयाची जाणीव होऊ शकते. पण पुढच्याच वळणावर दुसरा मोठा, महान किंवा यशस्वी भेटतोच.

२) तुलनेऐवजी मेहनत, यश आणि काय करायचं आहे यावर जास्त लक्ष केंद्रीत करा. तुम्ही काही चांगलं केलं असेल तर स्वत:चं कौतुक करा. याने विचार प्रक्रिया सकारात्मक दिशेने नेण्यास मदत होईल. 

३) दुसऱ्यांप्रति सहज, सकारात्मक, उदार आणि मदतगार राहिल्याने स्वत:प्रति चांगली भावना निर्माण होते. तर टिका किंवा तुलनेमुळे दुसऱ्यांसोबतच व्यक्ती स्वत:प्रतिही क्रूर होतो.

४) कुणीही परिपूर्ण नसतं. पण याचा अर्थ हा नाही की, कुणी वाईट किंवा फालतू आहे. प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती विशेषता असतेच. फक्त ती ओळखणे गरजेचे आहे. 

५) गर्दीपासून वेगळं चालण्याची हिंमत ठेवणं सोपं काम नाहीये. असं तेच लोक करु शकतात जे अनावश्यक तुलनेच्या जाळ्यात अडकत नाहीत आणि असेच लोक काहीतरी वेगळं करु शकतात. 
 

Web Title: Partner compare makes relation weak, Know Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.