‘I Love You..' पेक्षा या ‘८’ गोष्टी जास्त ऐकणे पसंत करतात पार्टनर !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:43 AM2017-09-12T10:43:27+5:302017-09-12T16:13:27+5:30

जरी दोघांत वाद झाले असतील तर प्रेमाचे दोन शब्द बोलण्याने पुन्हा दोघांचे नाते बहरु शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपल्या नात्याला पुन्हा नवसंजिवनी देऊ शकतात.

Partners like to hear more than '8 things' than 'I Love You ..' | ‘I Love You..' पेक्षा या ‘८’ गोष्टी जास्त ऐकणे पसंत करतात पार्टनर !

‘I Love You..' पेक्षा या ‘८’ गोष्टी जास्त ऐकणे पसंत करतात पार्टनर !

Next
्याचजणांना वाटते की, आपला पार्टनर काळजी घेणारा आणि प्रत्येक समस्येत सोबत असणारा हवा. मात्र सध्याच्या धावपळीच्या युगात पती-पत्नींना एकमेकांना पुरेसा वेळ मिळत नाही. नात्याला निभविण्यासाठी गरज आहे ती, पार्टनर्समध्ये प्रेम आणि आदर यांची. जरी दोघांत वाद झाले असतील तर प्रेमाचे दोन शब्द बोलण्याने पुन्हा दोघांचे नाते बहरु शकते. चला जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आपल्या नात्याला पुन्हा नवसंजिवनी देऊ शकतात.  

* 'तू खूप सुंदर आहे'
आपल्या पार्टनरच्या बऱ्याच गोष्टी आपणास आवडतात मात्र त्याशिवाय जर आपल्या पार्टनरला ‘तू खूप सुंदर आहे...’ अशी कॉम्पलिमेंट देत असाल तर त्याला खूप चांगले वाटते.  
   
* 'ओके, मी सांभाळून घेईल'
बऱ्याचदा एखादे काम पूर्ण न झाल्याने आपला पार्टनर नाराज होतो, अशावेळी आपण पुढाकार घेऊन ओके, मी सांभाळून घेईल असे म्हणून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करा. 

* ‘मी आहे ना...’ 
आपल्या पार्टनरच्या चुकांना वारंवार दर्शविण्यापेक्षा त्याला आपल्या सोबतीची जाणिव करुन द्या. याने आपला पार्टनर चुका करणे बंद करेल आणि दोघांत प्रेमदेखील वाढेल.  

* ‘सर्व काही व्यवस्थित होईल...’ 
कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास आपल्या पार्टनरशी नाराज होण्यापेक्षा त्याची हिंमत वाढवा, त्यांना विश्वास द्या की, सर्व काही व्यवस्थित होईल.  

* 'काही हरकत नाही' 
बऱ्याचदा पार्टनरच्या तोंडून नकळत अशी गोष्ट निघते की ज्यामुळे आपणास वाईट वाटते. मात्र जर आपला पार्टनर आपल्या जवळ येऊन पश्चाताप करत असेल तर संताप करण्याऐवजी काही हरकत नाही म्हणून माफ करा.   

* 'पार्टनरचे म्हणणे ऐकणे'
जर आपला पार्टनर आपणास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचे म्हणणे ऐकून घ्या. याने आपल्या पार्टनरला आपण सोबत असण्याची जाणिव होईल.   
  
* 'पोहचल्यानंतर कॉल किंवा मॅसेज करावा'
काळजी घेणारा पार्टनर आपण एखाद्या ठिकाणी पोहचल्यानंतर आपणाकडून कॉल किंवा मॅसेजची अपेक्षा करतात. अशावेळी आपलेही कर्तव्य असते की, त्याला आपण व्यवस्थित पोहचल्याचे कळविले पाहिजे.  

* 'पार्टनरचे मत जाणून घेणे'
घरातील कोणत्याही लहान-मोठ्या गोष्टी आणि निर्यणांबाबत पार्टनरचे मत जाणून घेणे आवश्यक असते. याने तो आपल्याला घराचा एक महत्त्वपूर्ण सदस्य समजू लागतो आणि जबाबदाऱ्याही चागंल्या प्रकारे पार पाडतो. 

Also Read : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !

Web Title: Partners like to hear more than '8 things' than 'I Love You ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.