'या' व्यक्ती जोडीदाराशी अधिक असतात एकनिष्ठ; कधीच सोडत नाहीत साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:28 PM2019-05-30T15:28:28+5:302019-05-30T15:32:15+5:30
अनेकदा लोक पार्टनरसोबत छोट्या-छोट्य मुद्यांवरून भांडणं करतात आणि लगेच रिलेशन संपवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का?
अनेकदा लोक पार्टनरसोबत छोट्या-छोट्य मुद्यांवरून भांडणं करतात आणि लगेच रिलेशन संपवण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? रिलेशनशिपला वैतागलेल्या व्यक्ती एकमेकांप्रती जास्त लॉयल असतात. जर्नल ऑफ बायोबिहेवरल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, रिलेशनशिपमध्ये भांडणाऱ्या जोडप्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं.
192 जोडप्यांवर करण्यात आला रिसर्च
संशोधकांनी अशा 192 जोडप्यांवर संशोधन केलं, जे जवळपास 32 वर्षांपासून एकमेकांसोबत होते. या संशोधनाचा मुख्य उद्देश हे जाणून घेणं होतं की, कोणत्याही व्यक्तीची वागणूक आपल्या पार्टनरच्या मृत्यूनंतर कशाप्रकारे प्रभावित होत असते. संशोधनामध्ये प्रत्येक जोडप्याला प्रश्न करण्यात आला होता की, जर तुमच्या नात्यामध्ये भांडणं झाली तर तुम्ही ती कशी हाताळता?, भांडण झाल्यानंतर तुम्ही वेगळे होता का? त्यावेळच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवत का? किंवा जे काही त्यांच्या डोक्यात सुरू आहे, ते सर्व सांगून मोकळे होता?
जोडप्यांच्या स्ट्रॉन्ग बॉन्डिगचा फॉर्म्युला
संशोधकांना असं आढळून आलं की, आपल्या जोडीदारासोबत झालेल्या भांडणाला रिस्पॉन्स त्याच अंदाजात देणाऱ्यांचं नातं दीर्घकाळ टिकतं. याचाच अर्थ असा की, जर तुम्ही भांडणामध्ये तुमच्या पार्टनरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आक्रमक होऊन देत असाल, तर निश्चितच त्यांची बॉन्डींग जास्त मजबूत असते.
नातं आणखी सुंदर कसं कराल?
रिसर्चमध्ये संशोधकांना असं आढळलं की, भांडणांमध्ये तुमचे इमोशन्स बाटलीमध्ये बंद करण्याऐवजी त्यावर एकमेकांशी बोलणं उत्तम पर्याय आहे. शांत राहिल्याने तुम्हाला तुमच्या अडचणींवर उपाय नाही मिळणार. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे.
भांडणांवर असं मिळवा नियंत्रण
तुमच्या जोडीदाराप्रति असलेल्या फिलिंग्स आणि उत्तम मार्गदर्शनाच्या जोरावर तुम्ही रिलेशनशिपमध्ये होत असलेल्या भांडणांवर कंट्रोल मिळवू शकता. तुम्ही पार्टनरला समजावण्यासाठी आणि तुमचं नातं टिकवण्यासाठी तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करणंही आवश्यक आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.