​‘पोकेमॉन गो’ची बेधुंद अशी झिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 03:34 PM2016-07-13T15:34:31+5:302016-07-13T21:04:31+5:30

पण तुम्हाला माहित आहे का - काय आहे पोकेमॉन गो?

'Pokémon Go's Hot Junk' | ​‘पोकेमॉन गो’ची बेधुंद अशी झिंग

​‘पोकेमॉन गो’ची बेधुंद अशी झिंग

Next
नव्वदच्या दशकातील पोकेमॉनला नव्या आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमिंग अ‍ॅपमुळे मिळाले पुनरुज्जीवन; पण तुम्हाला माहित आहे का - काय आहे पोकेमॉन गो?

वेड, क्रेझ, ट्रेंड, फॅड काहीही म्हणा. इंटरनेट आणि व्हायरल मीडियाच्या युगात एखादी गोष्ट एवढी लोकप्रिय होते की, तिची दखल न घेणे अशक्य होते. सध्या ‘पोकेमॉन गो’ हा मोबाईल गेम ‘कल्चरल फेनोमेनन’ म्हणून गणला जावा एवढा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. ‘पोकेमॉन’ हे नाव ऐंशीच्या दशकानंतर जन्मलेल्या पीढीला ज्ञातच असेल. कार्टून सिरीज किंवा व्हिडियो गेमच्या माध्यमातून या पोकेमॉनने अख्ख्या पीढीला वेडे केलेले आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘निन्टेंदो’ नावाच्या कंपनीने मोबाईल गेम जगतात त्सुनामी आणत ‘पोकेमॉन गो’ गेमिंग अ‍ॅप निवडक देशांमध्ये लाँच केले. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्स ते फ्री डाऊनलोड करू शकतात. लाँच झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच ते गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड केलेले अ‍ॅप ठरले. दैनंदिन सक्रीय अँड्राईड यूजर्सच्या आकडेवारीत ‘पोकेमॉन गो’ ट्विटरला तगडी टक्कर देत आहे. 

काय आहे पोकेमॉन गो?

पारंपरिक पोकेमॉन गेममध्ये विविध प्रकारचे ‘पोकेमॉन्स’ शोधून त्यांना पोकेबॉल्स मारून पकडायचे असतात. जेवढे जास्त पोकेमॉन्स, तेवढी तुमची लेव्हल आणि पॉवर जास्त. असे सोपे गणित. पारंपरिक व्हिडियो गेम व्हर्जनप्रमाणेच ‘पोकेमॉन गो’मध्येसुद्धा पोकेमॉन्स शोधून पकडायचे आहेत. फरक फक्त एवढाच की ते तुम्हाला तुमच्या शहरात खरोखर फिरून शोधायचे आहेत. म्हणजे व्हिडिओ गेमच्या जगात पोकेमॉन शोधण्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या खर्‍याखुर्‍या जगात तुम्ही पोके मॉन्स शोधून त्यांना पकडू शकता.

स्मार्टफोनमधील जीपीएस आणि कॅमेर्‍याचा वापर करून ‘पोकेमॉन गो’मध्ये असा आभास निर्माण करण्यात येतो की जणू काही आपल्या अवतीभोवती पोकेमॉन्स आहेत. तुमचे लोकेशन आणि वेळेनुसार तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पोकेमॉन्स डोकावतात. तुमच्या परिसराची जशीच्या तशी प्रतिकृती या गेममध्ये दिसते. 

खर्‍या जगात तुम्ही जसे फिरणार त्याचप्रमाणे गेममधील तुमचा अवतार (ट्रेनर) फिरणार. तुम्ही कोठे आहात त्यानुरूप पोकेमॉन्स तुमच्या समोर येणार. म्हणजे तुम्ही जर तलाव किंवा समुद्राजवळ असाल तर जलचर पोकेमॉन्स किंवा रात्रीच्या वेळी निशाचर पोकेमॉन्स तुम्हाल दिसतील. खर्‍या जगात तुम्ही फिरून जास्तीत पोकेमॉन्स शोधावेत असा या गेमचा मूळ उद्देश आहेत.

{{{{twitter_video_id####}}}}

पोकेफीचर्स

परिसरातील मुख्य जागा गेममध्ये ‘पोकेस्टॉप्स’ म्हणून दिसणार. येथे तुम्ही पोकेबॉल आणि पोकेएग मिळवू शकता. जास्तीत जास्त पोकेमॉन्सना आकर्षित करण्यासाठी पोकेस्टॉपचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच इतर प्लेयर्सला तुम्ही येथे भेटू शकता. ट्रेनरर्सना सर्वच्या सर्व १५१ पोकेमॉन्सना पकडून ‘पोकेमास्टर’ होण्यासाठी दिवसरात्र हा गेम खेळावा लागणार आहे. पैसे भरूनही तुम्ही पोकेमॉन्सना आकर्षित करू शकता. म्हणजे गेम जरी फ्री असला तरी कंपनी याप्रकारे कमाई करणार आहे. 

लवकरच ‘पोकेमॉन गो’मध्ये मल्टीप्लेयर आणि बॅटल असे फीचर्स येणार आहेत. ज्यांनी लहानपणी पोकोमॉन पाहिले किंवा खेळले आहे त्यांच्यासाठी ‘नॉस्टेल्जिक’ फॅक्टरमुळे या गेमचे विशेष आकर्षण आहे. नव्या पीढीला आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी फीचरमुळे ‘पोकेमॉन गो’ इंटरेस्टिंग वाटत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात ‘पोकोमेनिया’ शिगेला पोहचणारा असे दिसतेय. 

नव्वदच्या दशकाचा ‘पोकेमेनिया’

१९९६ साली जपानमध्ये सर्वप्रथम ‘पोकेमॉन’ गेम अस्तित्त्वात आला. जपानी भाषेत याचा अर्थ ‘खिशात सामावणारा राक्षस’ असा होतो. दोन वर्षांनंतर १९९८ साली ‘पोकेमॉन रेड अँड ब्लू’ने अमेरिकेत प्रवेश केला आणि ‘पोकेमेनिया’चा उदय झाला. मग पुढे पोकेमॉन येलो, गोल्ड आणि सिल्वर असे अनेक व्हर्जन्स आले. ‘पोकेमॉन स्नॅप’ आणि ‘पोकेमॉन पिनबॉल’ असे स्पिनआॅफ, लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड टीव्ही शो, चित्रपट, ट्रेडिंग कार्डस् आणि इतर अनेक माध्यमातून पोकेमॉनने लोकांच्या फँटसलीला आणि खाद्य पुरवले.



आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी

‘पोकोमॉन गो’ हा काही व्हीआर गेम नाही. तो आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेम आहे. व्हिडियो गेम आणि वास्तविक जगाची सांगड म्हणजे ‘आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी’. यामध्ये तुम्ही खर्‍या जगातच जणू कही व्हिडियो गेम खेळत आहात असा आभास निर्माण करण्यात येतो. पोकेमॉन व्हिडियो गेम आल्यापासून अनेकांना वाटत होते टीव्ही शोमधील अ‍ॅश केचमसारखे आपणही जर खर्‍या जगात पोकेमॉन शोधू शकलो तर? त्यांना कैद करून जिम लिडर्सला हरवून चॅम्पियन बनू शकलो तर? कंपनीने हेच ओळखून अखरे तंत्रज्ञानाचा अनोखा उपयोग करत पोकेमॉनला ‘आॅगमेंटेड रिअ‍ॅलिटी’द्वारे रिअल जगात आभासीपणे जिवंत केले.

तक्रारी आणि समस्या

* हा गेम खेळण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे बॅटरी संपणे. जीपीएस, कॅमेरेचा लगातारा वापर करावा लागत असल्यामुळे मोबईलची बॅटरी झपाट्याने उतरते. गेमचा पूरेपूर आनंद घ्यायचा असेल तर पोर्टेबल चार्जर आणि एक्स्ट्रा बॅटरीज् सोबतच ठेवाव्या लागतील.

* परिसरातील ज्या जागा ‘पोकेस्टॉप्स’ आहेत तेथे लोकांची गर्दी वाढत आहे. आॅस्ट्रेलियामध्ये तर खासगी इमारती/परिसरात लोक शिरकाव करत आहेत. त्यामुळे पोलिसांना लोकांना असे न करण्याचे आव्हान करावे लागले.

* अमेरिकेतील मिसूरी शहरात कथित चार चोरट्यांनी यूजर्सना पोकेमॉन्स मिळवून देण्याच्या अमिषाने ‘पोकेस्टॉप्स’पाशी येण्यास आकर्षित करून त्यांची लूट केल्याचेदेखील वृत्त आहे.

* नाझी छळछावणीत मृत्यू झालेल्या पीडितांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या ‘यूएस होलोकॉस्ट मेमोरिअल म्युझियम’ आणि ‘आर्लिंग्टन नॅशनल सेमेटरी’ने लोकांना अशा पवित्र जागी पोकेमॉन न शोधण्याची विनंती केली आहे.

* एका तरुण मुलीला तर पोकेमॉन शोधात  फिरत असताना अडगळीच्या ठिकाणी मृतदेह आढळून आल्याची घटनादेखील घडली आहे.



कोणत्या ठिकाणी ‘पोकेमॉन खेळू नये’?

* चित्रपटगृह
* स्मशानभूमी
* धोक्याचे किंवा अवजड कामे करत असताना
* खासगी प्रॉपर्टी
* हॉस्पिटल
* वर्दळीच्या ठिकाणी
* आणि जिथे इतरांना त्रास होणार नाही व स्वत:ची सुरक्षा धोक्यात येणार नाही.

भारतात अजून लाँच नाही!

भारतात अद्याप ‘पोकेमॉन  गो’ उपलब्ध नाही. अमेरिका, न्युझीलँड, आॅस्ट्रलिया येथे हा गेम लाँच करण्यात आला आहे. सुरूवातीला मिळालेल्या तुफान प्रतिसादामुळे कंपनीचे सर्व्हर क्रॅश झाले होते. सर्व्हरची क्षमता आणि एक्स्ट्रा फीचर्स वाढवण्यासाठी कंपनीने जगात इतरत्र लाँच करण्याची योजना काही काळासाठी थांबवली आहे. सो देसी गेमर्स, आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सेलिब्रेटींनाही पोकेमॉनचे ‘याड’

सामान्य लोकांप्रमाणेच अनेक हॉलीवूड सेलिब्रेटिंना या गेमची भूरळ पडली आहे. पुढील काही सेलिब्रेटिंनी आपले पोकेमॉन प्रेम त्यांनी ट्विट करून व्यक्त केले.

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: 'Pokémon Go's Hot Junk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.