Promise Day : पार्टनरला 'या' गोष्टींचं प्रॉमिस केलं तर होईल तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 10:23 AM2019-02-11T10:23:57+5:302019-02-11T10:30:06+5:30

व्हॅलेंटाइन वीकचा आज पाचवा दिवस. आज प्रॉमिस डे असून या दिवशी व्यक्ती पार्टनरला किंवा मित्रांना प्रॉमिस करतात.

Promise Day : Top 6 promises for couples to make as a gift for | Promise Day : पार्टनरला 'या' गोष्टींचं प्रॉमिस केलं तर होईल तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव!

Promise Day : पार्टनरला 'या' गोष्टींचं प्रॉमिस केलं तर होईल तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव!

googlenewsNext

(Imaage Credit : Hacker Noon)

व्हॅलेंटाइन वीकचा आज पाचवा दिवस. आज प्रॉमिस डे असून या दिवशी व्यक्ती पार्टनरला किंवा मित्रांना प्रॉमिस करतात. कधीही सोडून जाण्याचं प्रॉमिस, नेहमी साथ देण्याचं प्रॉमिस केलं जातं. खरंतर महिलांना आपल्या पार्टनरकडून काय हवं असतं किंवा त्यांच्या मनात काय असतं हे सांगणं कुणासाठीही जरा कठिणच काम असतं. पण आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही खास प्रॉमिसेस करू शकतात. जेणेकरून तुमचं प्रेम, मैत्री आणखी खुलेल. त्यांना आपल्या पार्टनरकडून काही खास गोष्टींची अपेक्षा असते. पण मुली त्या गोष्टी कधीही जाहीरपणे सांगत नाहीत. त्यांना असं वाटत असतं की, त्या गोष्टी त्यांच्या पार्टनरने समजून घ्याव्यात. चला जाणून घेऊया काय आहेत त्या गोष्टी....

गरज असेल तेव्हा तिची बाजू घेणार - ती प्रत्येकवेळी बरोबरच असेल असे नाही, पण त्यांना वाटत असतं की आपल्या पार्टनरने नेहमी त्यांची बाजू घ्यावी. ही गोष्टी त्या कधीही जाहीरपणे किंवा ओरडून सांगत नाहीत. तसंही कोणत्याही नात्यामध्ये दोघांनाही ही अपेक्षा असते की, दोघांनीही एकमेकांची बाजू घ्यावी. त्यामुळे तुम्ही तिला हे प्रॉमिस करू शकता की, तुम्ही नेहमी तिच्या बाजूने उभे रहाल.

जज करणार नाही - मुलींचं म्हणणं असतं की, भलेही त्या एकच एक कपडे परिधान करत असो, डाएटींग करत असतानाही मनात येईल ते खात असेल, रडताना ती हसत असेल किंवा खूप हिंमत असल्यासारखं बोलत असेल आणि प्रत्यक्षात घाबरट असेल तर या वागण्यावरुन पार्टनरने तिला जज करु नये. त्याने तिला ती आहे तशी स्विकारावी असं त्यांना वाटत असतं, पण त्या हे कधी सांगत नाहीत. तुम्ही हे जज न करण्याचही प्रॉमिस करू शकता.  

सरप्राईज देणार - मुली असो वा मुली सरप्राईज हे सर्वांनाच हवं असतं. सगळेच त्यासाठी उत्साही असतात. पण कुणीही स्वत:हून सरप्राईज मागत नसतात. पार्टनरने ते न सांगता स्वत:हून द्यावं असं मुलींना वाटत असतं. तिने त्याचा कधीही उल्लेख केला नाही याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना ते नकोय. त्यामुळे तुम्ही तिला सांगा की, तुम्ही तिसा सरप्राइजेस देणार. 

शब्द पाळणार - हे तुम्ही जसं त्यांना रोज गुड नाईट मेसेज पाठवता तसं आहे. तुम्ही एकदा दिलेला शब्द पाळवा किंवा त्यावर कायम रहावं असं त्यांना वाटत असतं. तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही तर त्या काही रडणार नाही किंवा रागावणार नाही, आपल्या पार्टनरने दिलेला शब्द पाळल्याचा आनंद तिला काही कमी नसेल.

गरज असेल तेव्हा पुढाकार घेणार - मॉडर्न महिला कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी जराही मागेपुढे पाहत नाहीत. मग अशात त्यांच्या पार्टनरनेही अशावेळी काढता पाय घेऊ असे त्यांना वाटत असतं. त्या तुम्हाला याबाबत कदाचित काही बोलणार नाही, पण त्यांची तशी इच्छा असते.

एकमेकांचं स्वातंत्र जपणार - हा सगळा बॅलन्सचा मुद्दा आहे. प्रोटेक्टिव्ह असणं चांगलं आहे. पण अति प्रोटेक्टिव्ह असणं हे तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. हेच पझेसिव्ह असण्याबाबत आहे. कधी कधी काही प्रमाणात पझेसिव्ह असणं हे रोमॅंटिक ठरु शकतं. पण याचं प्रमाण जास्त झालं तर नातं अडचणीत येतं. मुलींना वाटत असतं की, यातील बॅलन्स आपल्या पार्टनरने सांभाळावा.

Web Title: Promise Day : Top 6 promises for couples to make as a gift for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.